मुंबई - डियर कॉम्रेड या चित्रपटातील जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या रिलेशनशिपची अनेकदा चर्चा पूर्वी घडली आहे. मधल्या काळात त्यांच्यात बिनसल्याच्याही चर्चा होती. असे असले तरी त्यांचे रिलेशन त्यांनी कधीही बोलून दाखवलेले नाही. मात्र अनेकवेळा ते एकत्र दिसल्यामुळे त्यांच्यात नाते असल्याची चर्चा होत होती. कालच रश्मिका मंदान्नाचा वाढदिवस पार पडला. या निमित्ताने विजय देवरकोंडाने रश्मिकाला शुभेच्छा दिल्या किंवा नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिकपणे शुभेच्छांची देवाण घेवाण झालेली नाही. विजय रश्मिकाला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा देईल आणि त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चेला लगाम घालेल असा अनेकांचा तर्क होता. पण तसे घडू शकलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यात बिनसल्याचे किंवा ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्यात ब्रेकअप- आता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना एकत्र नाहीत याची काहींना खात्री वाटत आहे. विजय देवरांकोंडाने ट्विटर आणि इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया हँडल वापरणे टाळले आणि रश्मिकाला तिच्या वाढदिवसाच्या सार्वजनिकरित्या शुभेच्छा दिल्या नाहीत. अनेक युजर्सचा असा विश्वास होता की अलीकडेच समोर आलेल्या ब्रेक-अपच्या अफवा तिच्या वाढददिवशीच्या मौनामुळे खऱ्या असू शकतात. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, गेल्या आठवड्यातील बातमीनुसार रश्मिका मंदान्ना आणि विजय सध्या टेडिंग करत नाहीत. तर, ती सध्या तेलुगु अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनिवासला डेट करत आहे.