महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kushi Trailer Date OUT: विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू स्टारर 'खुशी' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर... - खुशी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची डेट जाहीर

विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांचा 'खुशी' चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. याआधी आता या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर झाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाणून घेण्यासाठी वाचा...

Kushi Trailer Date  out
खुशी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची डेट जाहीर

By

Published : Aug 7, 2023, 3:49 PM IST

मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू त्यांच्या 'खुशी' चित्रपटामुळे सध्या खूप चर्चेत आहेत. विजय देवरकोंडा स्टारर 'खुशी' या चित्रपटाबाबत सध्या एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. याशिवाय 'खुशी' वाट चाहते आतुरतेने पाहत आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आणि गाणी प्रदर्शित झाली आहेत. दरम्यान आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी विजय आणि सामंथाचा रोमँटिक फोटो शेअर करून चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. याशिवाय विजयने देखील या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याने तेलगू भाषेतील हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर कधी येणार आहे. या सर्व गोष्टी पोस्टमध्ये चाहत्यांना सांगितल्या आहेत.

खुशीचा ट्रेलर कधी रिलीज होणार :विजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याची सहकलाकार सामंथा रुथ प्रभूसोबतचा एक रोमँटिक आणि मोहक फोटो शेअर केला आणि लिहिले, 'हा आला, चित्रपट 'खुशी'चा ट्रेलर ९ ऑगस्टला रिलीज. चित्रपटाचा ट्रेलर २.४१ मिनिटांचा आहे. हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे'. असे विजयने त्याच्या पोस्टमध्ये त्याच्या चाहत्यांना सांगितले आहेत.

'खुशी' चित्रपटाबद्दल : 'खुशी' या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केले आहे. जर आपण चित्रपटाच्या कथेबद्दल बोललो तर हा चित्रपट आर्मी ऑफिसर विजय देवरकोंडा आणि काश्मिरी मुलगी सामंथा यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. नवीन येरनानी आणि वाय रविशंकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्सने केली आहे. 'खुशी' चित्रपटात विजय आणि सामंथा यांच्या व्यतिरिक्त जयराम, सचिन खेडाकर, मुरली शर्मा, लक्ष्मी, अली, रोहिणी, वेनेला किशोर, राहुल रामकृष्ण, श्रीकांत अय्यंगार आणि सरन्या यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'खुशी' हा चित्रपट तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Kartik Aaryan : 'शहजादा' या चित्रपटाच्या अपयशानंतर कार्तिक आर्यन घेतला 'हा' निर्णय...
  2. RRKPK Collection Day 10 : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा केला पार...
  3. Neha sharma and aisha sharma : नेहा शर्मा आणि आयशा शर्माचे आईस डिप चॅलेंज

ABOUT THE AUTHOR

...view details