मुंबई : विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू एका अनोख्या प्रेमकथेसह मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. विजयने आधी जाहीर केल्या प्रमाणे या चित्रपटाचा ट्रेलर ९ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. २ मिनिट ४१ सेकंदांचा हा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.
ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाकडून 'यू' सर्टिफिकेट मिळाले : विजय देवरकोंडाने खुशी या चित्रपटाबाबत खुलासा करत सांगितले होते की, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचा ट्रेलर मंजूर केला आहे. याशिवाय ट्रेलरमध्ये कोणताही कट सेन्सॉर बोर्डाने केला नाही. ट्रेलरला यू प्रमाणपत्र मिळाले आहे, असे त्याने सांगितले होते.
'खुशी'ची कहाणी काय आहे? :शिव निर्वाण दिग्दर्शित 'खुशी'ची कहाणी एका अनोख्या प्रेमकथेवर आधारित असून लग्नानंतर या जोडप्याला काय समस्या निर्माण होतात. हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात सामंथा ही काश्मिरी पंडिताच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझर आणि पोस्टरमध्ये सामंथा आणि विजयची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच आवडली आहे. या दोघांमधील केमिस्ट्री पाहून चाहते चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत. हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
कसा आहे ट्रेलर : काश्मीरच्या पार्श्वभूमीवर विजय ( विप्लव ) आणि सामंथा (आराध्या ) भेटतात. अर्थात दोघेही प्रेमात पडतात. सुरुवातीला विजयला सामंथा मुस्लीम आहे असे वाटते, पण ती काश्मीर पंडितांची मुलगी आहे. ते प्रेमावर विश्वास ठेवतात आणि एकमेकांच्या घरी याविषयी सांगतात. मात्र कुंडलीत दोष निघतो आणि हे लग्न फलदायी ठरणार नाही असा निर्णय कुटुंबीय घेतात. अखेर ते परस्पर लग्नाचा निर्णय घेतात. मात्र त्यांच्या स्वभावातील दोष त्यांच्या संसारात अडथळा बनतो. यावर ते कसे मात करतील आणि त्यांचा संसार सुरळीत होईल का याबद्दलची उत्कंठा ट्रेलरमध्ये तयार होते. विजय देवराकोंडा आणि सामंथाची जोडी पडद्यावर खूप सुंदर दिसत आहे. पार्श्वसंगीतही उत्तम आहे.
सामंथा आणि विजय वर्कफ्रंट :'खुशी' व्यतिरिक्त सामंथा रुथ प्रभूची 'सिटाडेल इंडिया' ही वेबसिरीजही येणार आहे. रुसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल इंडिया' या वेबसिरीजमध्ये ती वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विजयबद्दल बोलायचे झाले तर तो 'वीडी १२'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
हेही वाचा :
- Sadhguru And OMG 2 Movie : अक्षय कुमारने सद्गुरुसाठी 'ओह माय गॉड २'चे केले खास स्क्रिनिंंग
- Dharmaveer 2 : 'धर्मवीर २' चित्रपटाची मंगेश देसाईने केली घोषणा, उलगडणार 'साहेबां'च्या हिंदुत्त्वाची गोष्ट
- Sadhguru And OMG 2 Movie : अक्षय कुमारने सद्गुरुसाठी 'ओह माय गॉड २'चे केले खास स्क्रिनिंंग