मुंबई - कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 हा जोरदारपणे साजरा होत आहे. हा फेस्टिव्हल 16 मे रोजी सुरू झाला आणि या कार्यक्रमाची समाप्ती ही 27 मे रोजी होणार आहे. या कार्यक्रमात हॉलिवूडपासून तर बॉलिवूड पर्यंतचे आणि जगभरातील अनेक स्टार आले होते. या कार्यक्रमातील अनेक फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. सध्या असाच एक फोटो दिग्दर्शक विघ्नेश शिवनने त्याच्या इंन्टाग्राम अकाउंटवर सेल्फी फोटो शेअर केला आहे. या फोटोत विघ्नेश हा हॉलीवूड स्टार टोबे मैग्वायरसोबत दिसत आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 : विघ्नेशने त्याच्या पोस्टवर कॅप्शन देत लिहले, कान्सच्या जागतिक प्रीमियरमध्ये तुमचा मैत्रीपूर्ण शेजारी स्पायडर-मॅन'सोबत असे कॅप्शन दिले. या फोटोमध्ये, दोघे ही काळ्या सूटमध्ये आहेत. शिवाय फोटोमध्ये दोघे हसत आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट केली आहे. एकानी लिहले, 'प्रत्येक 90 च्या मुलांचे स्वप्न आमच्या बालपणीच्या नायकांसोबत सेल्फी घेण्याचे स्वप्न होते' तर दुसर्याने कमेंट केली, 'संपूर्ण अमेरिकन पापाराझी माझ्या माणसाला घाबरले आहेत आणि तुम्ही त्याच्यासोबत फोटो काढलात? असो, हे तुमच्या आयुष्यात एकदाच घडलेले स्वप्न असावे.' अशा निरनिरळ्या प्रकारच्या कमेंट आल्या आहे.