मुंबई -अभिनेता विद्यूत जामवाल त्याच्या धाडसीपणाने आणि स्टंट्सने त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतच बांधकाम साइटवर काम करणाऱ्या एका चाहत्याला भेटण्यासाठी ( Vidyut Jammwal Meet Fan ) त्याने खरोखर स्टंटबाजी केली. त्याचा व्हिडीओ त्याने इंस्टाग्राम हँडलवर टाकला आहे. इमारतीच्या बाल्कनीतून खाली उतरण्यासाठी त्याने बाजूला असलेल्या लोखंडी खांबांचा वापर केला.
व्हिडिओमध्ये, विद्यूत बाल्कनीत उभा असताना, शेजारीच बांधकाम करणाऱ्या मजूर चाहत्याने ( Construction Worker Fan ) विद्यूतच्या कामाचे कौतुक केले. त्यावर विद्यूतने त्याचा चित्रपट पाहिला आहे का? असे विचारले. त्यावर बांधकाम मजूर चाहत्याने हो म्हटले. मग विद्यूतने चाहत्याला फोटो काढण्यासाठी फोन आहे का? असे विचारले. त्यावर त्याने फोन असल्याचे सांगितले. मग विद्यूत जामवाल हा खांबांच्या मदतीने खाली उतरतो ( iron poles ) आणि चाहत्यासोबत फोटो काढतो.