मुंबई :बॉलिवूडची 'डर्टी पिक्चर' फेम अभिनेत्री विद्या बालन पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर जादू चालविण्यासाठी येत आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्या 'नीयत' चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक तिच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता, त्यामुळे या चित्रपटाच्या रिलीजबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. विद्या शेवटी 'जलसा' या चित्रपटात दिसली होती आणि आता ती 'नीयत' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा दाखल होत आहे. अनु मेनन दिग्दर्शित चित्रपट 'नीयत'चे ट्रेलर 22 जून रोजी प्रदर्शित झाले आहे. खुद्द विद्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. विद्या ट्रेलरमध्येही बंडखोरी करताना दिसत आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2022 मध्ये सुरू झाले होते. विद्याचा नोव्हेंबर २०१७ मध्ये आलेल्या चित्रपट 'तुम्हारी सुलू' हा चित्रपट शेवटचा मोठ्या पडद्यावरील होता. आता पुन्हा ती 'नियत' मधून 6 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परत येत आहे.
विद्या बालन एक गुप्तहेर बनली :२.२५ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये विद्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढवली आहे. विद्या या चित्रपटात एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे, जी एका खुनाचे गूढ उकलण्यात गुंतलेली आहे. या चित्रपटात एक खास गोष्ट अशी आहे की यावेळी, विद्याचा लूक थोडा बदललेला दिसत आहे.