महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Vidya Balan breaks silence : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्या बालनने 'मुलगी' असल्याच्या दाव्यावर सोडले मौन - Vidya Balan breaks silence

Vidya Balan breaks silence : अभिनेत्री विद्या बालन अलिकडेच मुंबई विमानतळावर एका तरुणीसोबत स्पॉट झाली होती. ही मुलगी विद्या बालनची मुलगी असल्याचा दावा एका पापाराझी अकाऊंटवर करण्यात आला होता. याबाबत विद्या बालनने पहिल्यांदाच आपलं मौन सोडलं असून ती मुलगी कोण, याचा खुलासा केलाय.

Vidya Balan breaks silence
विद्या बालन

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 5:16 PM IST

Updated : Oct 9, 2023, 5:21 PM IST

मुंबई- Vidya Balan breaks silence : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन मुंबई विमानतळावर एका सुंदर मुलीबरोबर दाखल झाली. या दोघींना पाहताच उपस्थित पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघींनीही फोटोसाठी पोझ दिल्या. ही सुंदर मुलगी विद्या बालनची मुलगी असल्याचा दावा काही पापाराझींनी केल्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधलं गेलं. एक व्हिडिओ सोशल मीडियावर पापाराझी अकाऊंटवरुन व्हायरल झालाय. त्याच्या कॅप्शनमध्ये 'विद्या बालन आपल्या सुंदर मुलीसोबत', असं कॅप्शन दिलं आहे. यानंतर काही नेटिझन्सनी विद्यासोबत असलेली ती मुलगी कोण याची शोध सुरू केला. तर काहींनी सोशल मीडियाच्या या युगात विद्या बालननं वैयक्तिक आयुष्य इतके दिवस खासगी ठेवल्याबद्दल तिचं कौतुकही केलं होतं.

विद्या बालनने एका न्यूजवायरशी नुकत्याच झालेल्या संवादात या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय. पापाराझी उकाऊंटवर प्रसिद्ध झालेला मुलीसोबतचा व्हिडिओ तिच्या भाचीचा असल्याचं तिनं सांगितलं. तिच्या भाचीचं नाव इरा आहे. ती विद्या बालनच्या बहिणीची मुलगी आहे. विद्या बालनने सांगितलं की बहिणीला दोन जुळी मुलं आहेत. यातील मुलीचं नाव इरा आहे आणि मुलाचं नाव रुहान असं आहे. या मुलांवर विद्याचं मावशी या नात्यानं खूप प्रेम आहे. ही मुलं आपल्या जुळ्या जीवनरेखा असल्याचं विद्या मानते. त्यांच्याबद्दल ती नेहमीच प्रेमानं बोलत असते. विद्या बालनचं प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर 2012 मध्ये लग्न झालं आहे.

कामाच्या आघाडीचा विचार करता विद्या बालन अलीकडेच 'नियती' या चित्रपटात झळकली होती. यात तिनं सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. शिर्ष गुहा ठाकुरता दिग्दर्शित 'लव्हर्स' या आगामी चित्रपटात ती दिसणार आहे. आगामी चित्रपटामध्ये अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आणि प्रतीक गांधी यांच्याबरोबर ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विद्या बालननं 2005 मध्ये आलेल्या 'परिणीता' या हिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिच्या नावावर अनेक उत्तम कलाकृतींची नोंद झाली आहे.

Last Updated : Oct 9, 2023, 5:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details