महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर'नं 100 कोटींचा टप्पा केला पार

Sam Bahadur 100 Crore: 'सॅम बहादूर'नं अखेर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला 'अ‍ॅनिमल' या चित्रपटासोबत थिएटरमध्ये रिलीज झाला होता.

Sam Bahadur 100 Crore
सॅम बहादूर 100 कोटी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 3:25 PM IST

मुंबई - Sam Bahadur 100 Crore :विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाशी झाली. या संघर्षामुळेचं या चित्रपट व्यवसायाला मोठा फटका बसला. तरीही, 'सॅम बहादूर' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर संघर्ष करून जगभरात 100 कोटीचा आकडा पार केला आहे. पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटानं चांगली कमगिरी रुपेरी पडद्यावर केली आहे. विकी कौशलनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'सॅम बहादूर'चं जगभरातील कलेक्शन शेअर केले आहे.

'सॅम बहादूर'चं कलेक्शन :विकी कौशलनं चित्रपटाचं पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ''सॅम बहादूर' बॉक्स ऑफिसवर अभिमानानं आणि विजयासह पुढं जात आहे, आम्ही सर्वांचे आभारी आहोत.'' या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 6.25 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी, मॉर्निंग शोमध्ये चित्रपटाच्या कमाईत 40 टक्क्यांनी वाढ झाली. यानंतर या चित्रपटानं 9 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं. त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी चांगल्या ट्रेंडसह या चित्रपटानं 10.30 कोटी रुपयांचा कलेक्शन पार केलं होतं. आता देशांतर्गत या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 76.6 कोटी झालं आहे. सॅम बहादूरचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित आहे, ज्यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यादरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

'सॅम बहादूर' बॉक्स ऑफिस कलेक्शन

शुक्रवार पहिला दिवस - 6.25 - कोटी

पहिला शनिवार दुसरा दिवस - 9 कोटी

पहिला रविवार तिसरा दिवस - 10.3 कोटी

पहिला सोमवार चौथा दिवस - 3.5 कोटी

पहिला मंगळवार पाचवा दिवस - 3.5 कोटी

पहिला बुधवार सहावा दिवस - 3.25 कोटी

पहिला गुरुवार सातवा दिवस - 3 कोटी

आठवडा 1 कलेक्शन - 38.8 कोटी

दुसरा शुक्रवार आठवा दिवस - 3.5 कोटी

दुसरा शनिवार नव्वा दिवस - 6.75 कोटी

दुसरा रविवार दहावा दिवस - 7.5 कोटी

दुसरा सोमवार अकरावा दिवस - 2.15 कोटी

दुसरा मंगळवार बारावा दिवस - 2.25 कोटी

दुसरा बुधवार तेरावा दिवस - २ कोटी

दुसरा गुरुवार चौदावा दिवस - 1.65 कोटी

दुसरा आठवड्याचे कलेक्शन - 25.8 कोटी

तिसरा शुक्रवार पंधरावा दिवस - 2.25 कोटी

तिसरा शनिवार सोळावा दिवस- 4.5 कोटी

तिसरा रविवार सतरावा दिवस 17 - 5.25 कोटी

एकूण 76.6 कोटी

हेही वाचा :

  1. प्रभास स्टारर 'सालार' चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा सुरू
  2. अनन्या पांडेनं शेअर केला तिचा बालपणीचा व्हिडिओ, चाहत्यांनी केल्या कमेंट्स
  3. मुनावर फारकीवर आयेशा खाननं झाडल्या आरोपांच्या फैरी, विश्वासघात केल्याचा केला दावा

ABOUT THE AUTHOR

...view details