महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

विकी कौशल स्टारर चित्रपट 'सॅम बहादूर'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू; केली 'इतकी' कमाई - सॅम बहादूर चित्रपट

Sam Bahadur Advance Booking : विकी कौशलचा 'सॅम बहादूर' 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे.

Sam Bahadur Advance Booking
सॅम बहादूर अ‍ॅडव्हान्स बुकिंग

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 10:48 AM IST

मुंबई - Sam Bahadur Advance Booking : विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' 1 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'शी होईल. 'सॅम बहादूर' चित्रपटाची वाट अनेकजण खूप आतुरतेनं पाहत आहेत. दरम्यान या चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाली आहे. 'सॅम बहादूर'मध्ये विकी कौशल व्यतिरिक्त फातिमा सना शेख,सान्या मल्होत्रा, साकिब अयुब,मोहम्मद झीशान अय्युब, नीरज काबी आणि इतर कलाकार दिसणार आहेत. विक्की कौशलच्या या चित्रपटाच्या बुकिंगचा रिपोर्ट समोर आला.

'सॅम बहादूर'चा आगाऊ बुकिंगचा रिपोर्ट : विकी कौशलचा 'सॅम बहादूर' हा या वर्षातील बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'सॅम बहादूर'चित्रपटात विकी कौशलनं देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये 1971 रोजी बांगलादेशच्या मुक्तीसाठी भारतीय सैन्याचे नेतृत्व माणेकशॉ यांनी कसे केले, याबद्दलची कथा मांडण्यात आली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाची आतापर्यंत 18 हजार 861 तिकिटे विकली गेली आहेत. यासह 'सॅम बहादूर'नं आतापर्यंत 64 लाख 13 हजार रुपयांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग केली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

'अ‍ॅनिमल'नं अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'सॅम बहादूर'ला मागे टाकले : 'सॅम बहादूर'च्या पहिल्या दिवसाच्या फर्स्ट शोचे आगाऊ बुकिंग अतिशय संथ गतीने केलं जात आहे. दुसरीकडे रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ला बंपर अ‍ॅडव्हान्स बुकिंग मिळत आहे. आत्तापर्यंत प्री-तिकीट सेलमध्ये 6 कोटींहून अधिक कमाई या चित्रपटानं केली आहे. विकी कौशलचा 'सॅम बहादूर' 'अ‍ॅनिमल'च्या तुलनेत कमी कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. आरएसव्हीपी मूव्हीज या बॅनरखाली आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित हा चित्रपट रुपेरी पडद्यावर किती कमाई करेल, हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे

हेही वाचा :

  1. जावयाचं कौतुक करत महेश भट्टनं रणबीर कपूरला म्हटलं, 'जगातील सर्वोत्तम पिता'
  2. सुशांत सिंग राजपूतचे घर विकत घेतल्याच्या अफवांवर अदा शर्मानं मौन सोडले ; म्हणाली 'माझे घर हेच माझे मंदिर'
  3. वेंडिंग प्लॅनबद्दल विचारण्यात आल्यानंतर विजय वर्मानं दिली 'ही' प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details