मुंबई Vicky Kaushal - Katrina Kaif : अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफनं 9 डिसेंबर 2021 रोजी मोठ्या थाटामाटात राजस्थानमध्ये लग्न केलं. या लग्नात मीडियाला एंट्री नव्हती. मात्र त्यांच्या लग्नातील अनेक फोटो यादरम्यान व्हायरल झाले होते. लग्नापूर्वी दोघेही एकमेकांना डेट करत होते. पण त्यांनी त्यांचं नातं दोघांनीही लपवून ठेवलं होतं. यावर्षी डिसेंबरमध्ये या जोडप्याच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान आता एका मुलाखतीमध्ये विक्की कौशलने त्याच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे. विक्की अलीकडेच वि आर युवाजच्या 'बी अ मॅन यार'च्या एपिसोडमध्ये दिसला होता. या एपिसोडमध्ये त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल काही खुलासे केले.
विक्की कौशलची मुलाखत : विक्कीने यावेळी कतरिना कैफसोबतच्या नात्याबद्दल दिलखुलासपणे गप्पा मारल्या. तो म्हणाला की, कतरिना ही त्याच्यासोबत रिलेशनमध्ये आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. कतरिना त्याची काळजी घ्यायला लागली होती. त्यानंतर तो कतरिनालाच्या प्रेमात पडला. पुढे विक्कीने सांगितलं की, मला त्या वास्तवाशी जुळवून घेताना त्रास झाला. जेव्हा मी कतरिनाला जवळून ओळखलं, तेव्हा मी प्रेमात पडलो. ती खूप छान व्यक्ती आहे हे मला माहीत आहे. मला सुरुवातीपासूनच वाटायचं की ती माझी पत्नी असावी. मला आधी तिच्याकडून जे अटेंशन मिळत होतं, ते मला विचित्र वाटायचं. कतरिना मला एक अद्भुत व्यक्ती वाटायची आणि आजही वाटते आणि ती तशीच आहे.