मुंबई- बॉलिवूड स्टार विकी कौशलने ( Vicky Kaushal ) मंगळवारी सांगितले की त्याने फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉवरील ( Sam Manekshaw Biopic ) बायोपिक असलेल्या सॅम बहादूर या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मेघना गुलजार दिग्दर्शित ( directed by Meghna Gulzar ) आणि रॉनी स्क्रूवाला ( Ronnie Screwvala ) यांच्या आरएसव्हीपी मूव्हीज निर्मित चरित्रात्मक चित्रपटात युद्ध नायकाची भूमिका साकारणार आहे.
विकी कौशलने इन्स्टाग्रामवर हे अपडेट फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत शेअर केले आहेत. "हे घ्या... तयारी सुरू झाली! #सॅम बहादूर @आरएसव्हीपी मूव्हीज ," असे कॅप्शन विकीने पोस्टला दिले आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान माणेकशॉ हे भारतीय लष्कराचे प्रमुख होते आणि फील्ड मार्शल पदावर बढती मिळालेले पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते.