महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Vicky and Katrina movie together : 'कतरिनासोबत काम करायला आवडेल पण..' विकी कौशलचा खुलासा - विकी कौशलचा खुलासा

Vicky and Katrina movie together : विकी कौशल आणि कतरिना कैफनं विवाह केला असला तरी अद्यापही त्यांनी चित्रपटात एकत्र काम केलेलं नाही. आपल्याला एकत्र काम करायला आवडेल, असं विकीन एका मुलाखतीात सांगितलंय.

Vicky and Katrina movie together
विकी कौशल आणि कतरिना कैफ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 12:10 PM IST

मुंबई - Vicky and Katrina movie together : कतरिना कैफने विकी कौशलसोबत डेटिंग केलं, प्रेम केलं, लग्नही केलं पण दोघांनी एका चित्रपट काम मात्र केलेलं नाही. विकी कौशलला पतीसोबत स्क्रिन स्पेस शेअर करायची इच्छा आहे. तिच्यासोबत काम करायला आवडेल पण ते सर्व ऑर्गनिकली घडायला हवे, असे त्यानं म्हटलंय

एका वृत्तसंस्थेशी बोलताना विकी म्हणाला की कतरिना आणि त्याला पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा माहिती आहे. यासाठी तो योग्य स्क्रिप्टची वाट पाहतोय. तो म्हणाला, 'आम्हाला स्वतःलाही एकत्र पाहायला आवडेल. पण आम्ही एकत्र आलोत म्हणून नाही तर ते ऑर्गनिकली आणि योग्य कारणासाठी घडून आलं पाहिजे.'

विकी आणि कतरिना हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक अपवादात्मक जोडपे आहे ज्यांनी यापूर्वी एकत्र काम केलेलं नाही. या दोन्ही लव्हबर्ड्सनी डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. त्यांचे लग्न हे त्या वर्षातील सर्वात मोठे चर्चेचा विषय ठरले होते. यावर्षी डिसेंबरमध्ये दोघांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण होणार आहेत.

विकी आणि कतरिना लग्नापूर्वी दोघेही एकमेकांना डेट करत होते. पण त्यांनी त्यांचं नातं दोघांनीही लपवून ठेवलं होतं. लिकडेच एका मुलाखतीमध्ये विक्की कौशलने त्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल खुलासा केला आहे. विक्की अलीकडेच वि आर युवाजच्या 'बी अ मॅन यार'च्या एपिसोडमध्ये झळकला होता. या एपिसोडमध्ये त्याने आपल्या खासगी आयुष्यबद्दल काही खुलासे केले.

विक्कीने यावेळी कतरिना कैफसोबतच्या नात्याबद्दल दिलखुलासपणे भाष्य केलं. तो म्हणाला की, कतरिना ही त्याच्यासोबत रिलेशनमध्ये आहे या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नव्हता. जस जसे लक्षात येत गेले तसे तो तिच्या प्रेमात पडला. त्याला ते वास्तव स्वीकारणं कठीण गेलं. जेव्हा ती खूप मनानं मोकली आणि छान व्यक्ती आहे हे त्यानं जाणलं तेव्हा तेव्हा त्याला ती आपली पत्नी असावी असे वाटू लागलं. सुरुवातीला कतरिनाकडून त्याला अटेंशन मिळालं, त्याला ती एकदम अद्भत व्यक्ती वाटायची. आजही त्याला तसेच वाटते, असे तो म्हणाला होता.

दरम्यान, विकी कौशलचा द ग्रेट इंडियन फॅमिली हा नवीन चित्रपट 22 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. या प्रमोशन दरम्यानच त्यानं आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा केला आहे.

हेही वाचा -

१.Parineeti And Raghav Look Perfect : परफेक्ट पती पत्नी परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढाचे लग्नानंतरचे आकर्षक फोटो

२.Ragneeti Weeding : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा-आप नेते राघव चढ्ढा विवाहबंधनात अडकले, चाहत्यांना फोटोची प्रतिक्षा

३.Ragneeti Wedding : लग्नसोहळ्यातील परिणीती-राघवचा पहिला फोटो आला समोर; शेअर करताच केले डिलीट

ABOUT THE AUTHOR

...view details