महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Vicky Kaushal and Katrina : 'पॉवर कपल' विकी आणि कॅटरिना सहलीसाठी रवाना - विकी आणि कॅटरिना

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल गुरुवारी मुंबई विमानतळावर एकत्र सहलीला जात असताना दिसले. या जोडप्याला काळ्या रंगाच्या पोशाखात पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

Vicky Kaushal and Katrina
विकी आणि कॅटरिना सहलीसाठी रवाना

By

Published : Jun 15, 2023, 3:20 PM IST

मुंबई- अभिनेता विक्की कौशल अलिकडे त्याच्या जरा हटके जरा बचके चित्रपटाचे प्रमोशन करण्यात गुंतला होता. या कामातून सवड मिळताच त्याने पत्नी कॅटरिना कैफसोबत सुट्टीसाठी वेळ काढला आणि विमानतळ गाठले. गुरुवारी, या जोडप्याला मुंबई विमानतळावर पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. दोघेही स्नीकर्ससह काळ्या रंगाच्या हुडीज आणि पॅंटमध्ये मॅचिंग कपडे परिधान केलेले दिसले.

विमातळावर दिसले कॅटरिना आणि विकी - पापाराझींचा हा व्हिडिओ शेअर करताच दोघांच्याही चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडलाय. सोक त्यांच्यातील बॉडिंगबद्दल कौतुक करत आहेत. अनेकांनी कॅटरिनाच्या सुंदरतेची तारीफ केली आहे. तर काहीजण त्यांच्या एअरपोर्ट लूकची चर्चा करत आहेत. हार्ट आणि रेड इमोजींचाही भरपूर वापर फॉलोअर्सनी केलाय.

विकॅट एक सुखी कुटुंब- विकी कौशल त्याच्या मुलाखती आणि चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अनेकदा कॅटरिनाबद्दल बोलला आहे. बुधवारी त्याने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर कॅटसोबतचा एक फोटो शेअर केला होता. दोघांनी समुद्रकिनारा आणि सूर्यास्ताच्या शांत पार्श्वभूमीवर पोज दिली. हे जोडपे एकमेकांचा हात धरून हसताना फोटोत दिसत होते. दोघांच्यात असलेले प्रेमळ नाते आणि त्यांचा हेवा वाटणारा सुखी संसार दृष्ट लागण्यासारखा आहे.

बॉक्स ऑफिसवर जरा हटके जरा बचके- जरा हटके जरा बचके चित्रपट अजूनही थिएटरमध्ये कमाई करत आहे. चित्रपटावर प्रेक्षक बेहद्द खूश आहेत. या चित्रपटात विकी आणि सारा अली खानची केमेस्ट्री अत्यंत जमून आली आहे. विकी मध्यम वर्गीय एकत्र कुटुंबातील मुलगा म्हणून आपल्या भूमिकेला न्याय देताना दिसलाय. काही दिवासापूर्वी या चित्रपटात सारा अलीने केलेली भूमिका कॅटरिनाने का केली नाही असा सवाल विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना दिग्दर्शकाने सांगितले होते की, मध्यम वर्गीय कुटुंबाची सून म्हणून कॅटरिना शोभली नसती. हे उत्तर त्याच्या चाहत्यांनाही पटणारे होते. आजवर या चित्रपटाने ५३ कोटीहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेट ५० कोटी होते. आता सिनेमाचे बॉक्स ऑफिस फायद्याची कमाई करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details