महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी केली राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस

राज ठाकरे यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे आशा भोसले यांनी थेट राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. भेटीचे फोटो राज ठाकरे यांचे सचिव सचिन मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

By

Published : Jul 22, 2022, 11:27 AM IST

राज ठाकरेंच्या घरी आशा भोसले
राज ठाकरेंच्या घरी आशा भोसले

मुंबई- ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे आशा भोसले यांनी थेट राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. भेटीचे फोटो राज ठाकरे यांचे सचिव सचिन मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आशा भोसले यांनी दिले आशीर्वाद - काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या राज ठाकरे यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेनंतर अनेक दिग्गजांनी त्यांची भेट घेतली. आशा भोसले राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचल्या होत्या. यासोबतच राज ठाकरेंनी आशा भोसले यांचे आशीर्वादही घेतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आशा भोसले आणि राज ठाकरे यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

राज ठाकरेंनी घेतले आशा भोसलेंचे आशीर्वाद

राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया- काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पायाचा त्रास वाढला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांना डॉक्टरांनी दोन महिने विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

राज ठाकरेंच्या घरी आशा भोसले

राज ठाकरे पुन्हा सक्रिय- या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे पुन्हा एकदा पक्ष बांधणीत सक्रिय झाले आहेत. आगामी बीएमसी निवडणूक २०२२ च्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तयारी सुरू केली आहे. मनसे निवडणुकीची जोरदार तयारी करत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई विधानसभेच्या विविध क्षेत्रांनुसार स्वत: राज ठाकरे आढावा घेणार आहेत. आठवडाभर या बैठका सुरू असतील. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, पक्षाची स्थिती, स्थानिक परिस्थिती आणि निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले पदाधिकारींच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे.

हेही वाचा -'मेगाबजेट'मध्ये बनणार 'रामायण', रणबीर कपूर 'राम' तर 'रावणा'च्या भूमिकेत ह्रतिक रोशन!!

ABOUT THE AUTHOR

...view details