मुंबई - प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांचे २९ डिसेंबर रोजी मुंबईत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, नितीन हॉस्पिटलमध्ये आणि जवळपास 15 दिवस व्हेंटिलेटरवर होते. 3 डिसेंबर रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नितीन यांनी बोल राधा बोल, लाडला, यमला पगला दीवाना, आर्मी, शूल, लव्ह के लिए कुछ भी करेगा, दस, चल मेरे भाई, महा-संग्राम, इंसाफ, दिवानगी, नई पडोसन, अधर्म, बागी, ईना मीना डिका, तथास्तु, टँगो चार्ली, गली गली चोर है, दिल मांगे मोर आणि सब कुशल मंगल यांसारखे चित्रपट बनवले होते.