हैदराबाद- साऊथ स्टार अभिनेता विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांचा आगामी तेलुगू चित्रपट बुधवारी येथे अधिकृतपणे लाँच झाला. परशुराम पेटला दिग्दर्शित हा आगामी चित्रपट दिल राजूच्या बॅनरखाली निर्माण होत आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर अधिकृतपणे चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक ज्याचे नाव तात्पुरते VD13 असे ठरले आहे.
या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक भव्य मुहूर्त समारंभ आयोजित केला होता ज्यामध्ये चित्रपटाचे कलाकार आणि क्रू सदस्य उपस्थित होते. सोशल मीडियावर निर्मात्यांनी VD13 लाँच इव्हेंटमधील फोटोंची मालिका शेअर केली. मृणालनेही तिच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाच्या लॉन्चबद्दलचा उत्साह शेअर केला आहे.
सीता रामम या गाजलेल्या चित्रपटाची अभिनेत्री राहिलेल्या मृणालने असेही सांगितले की विजय आणि श्री वेंकटेश्वर क्रिएशन्ससोबत काम करण्यासाठी मी रोमांचित आहे. VD13 मुहूर्त समारंभातील फोटोंची स्ट्रिंग शेअर करताना, मृणालने लिहिले, 'एक अतिशय रोमांचक प्रवासातील पहिले पाऊल... श्री वेंकटेश्वर क्रिएशन्ससोबत काम करण्याची ही माझी पहिली वेळ आहे आणि विजय देवराकोंडासोबत स्क्रीन शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. शूट सुरू होण्यासाठी उतावीळ झाले आहे.'
मृणालच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, चाहत्यांनी विजयसोबतच्या तिच्या फोटोंवर आनंद व्यक्त केला. चाहत्यांना दोघांमधील 'केमिस्ट्री' किती कमालीची असू शकेल याचा अंदाज आहे. एका चाहत्यांने लिहिलंय की, ये जोडी तो हिट हो गी रिलीज होने से पहले ही. अशाच आशयाच्या अनेक प्रतिक्रिया वाचायला मिळत आहे. ही जोडी गीता गोविंदमचा विक्रम तोडेल असा विश्वासही काहींना वाटतोय.