महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Vatsal Sheth Birthday : इशिता दत्ताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत पती वत्सल सेठला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - इशिता दत्ताने दिल्या शुभेच्छा

इशिता दत्ताने पती वत्सल सेठला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सेलिब्रेशनचा एक अप्रतिम फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये या जोडप्यासोबत त्यांचे नवजात बाळ देखील दिसत आहे.

Vatsal Sheth
वत्सल सेठ

By

Published : Aug 5, 2023, 6:02 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वत्सल सेठ आणि अभिनेत्री इशिता दत्ता नुकतेच आई-वडील झाले आहेत. २०१७ मध्ये या कपलने लग्न केले होते. लग्नाच्या ६ वर्षानंतर इशिताने पहिल्या मुलाला जन्म दिला. दोघे आई-वडील झाल्यानंतर खूप आनंदी आहेत. हे जोडपे उघडपणे त्यांच्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. वेळोवेळी दोघेही आपल्या नवजात बाळाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान आता त्यांच्या मुलाच्या जन्माला १८ दिवस झाले असून या दाम्पत्याच्या घरात आणखी एक आनंदाचा क्षण आला आहे.

वत्सलचा वाढदिवस : वत्सल सेठ ५ ऑगस्ट रोजी त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. इशिता ही पतीच्या वाढदिवशी खूप आनंदी आहे. सोशल मीडियावर इशिताने वत्सलला एका सुंदर पोस्टद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान या खास प्रसंगी इशिताने पती वत्सल आणि मुलासोबतचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे. या फोटोत वत्सलने आपल्या मुलाला हातांवर घेतले असून हे जोडपे आपल्या मुलाकडे पाहत आहे. त्याचबरोबर या फोटोमध्ये केकदेखील दिसत आहे. वत्सलचा जन्म ५ ऑगस्ट १९८० रोजी मुंबईत झाला होता. दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इशिताने लिहिले आहे की, वाढदिवसाच्या शुभेच्छा वत्सल सेठ, तू मुलगा, मित्र, काका, नवरा आणि भाऊ अशा प्रत्येक भूमिकेचा भाग होतास आणि आता मी तुला वडिलांच्या भूमिकेत पाहत आहे, मला माहीत आहे की, वडिलांच्या भूमिकेतही तू हिट होशील, आय लव्ह यू वेट्टी, तुला सर्व सुखाची शुभेच्छा. असे तिने तिच्या पोस्टमध्ये लिहले आहे.

छोटा पडदा गाजवला :वत्सलने २०१४ मध्ये छोट्या पडद्यावरील मालिका 'एक हसीना थी'मध्ये काम केले होते. वत्सलची ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेत वत्सलसोबत अभिनेत्री संजीदा शेख मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर तो २०१६ मध्ये 'रिश्तों का सौदागर बाजीगर' या मालिकेतही झळकला होता. या मालिकेत वत्सलसोबत त्याची पत्नी इशिता दत्ताही होती. या मालिकेदरम्यान वत्सल सेठ आणि इशिता दत्ता प्रेमात पडले. या जोडप्यांनी बराचकाळ एकमेकांना डेट केले. त्यानंतर वत्सलने २०१७ मध्ये इशिता दत्ताशी गुपचूप लग्न केले. २०१४ मध्ये सलमान खानच्या 'जय हो' या चित्रपटात त्याने एक भूमिका साकारली होती. वत्सल आणि इशिता हे दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.

हेही वाचा :

  1. Top 5 Horror Movies In Hollywood : प्रेक्षकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या 'या' ५ भयानक हॉलिवूड चित्रपट...
  2. Sushmita sen : सुष्मिता सेनने 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांना दिले चांगलेच प्रत्युत्तर...
  3. Kangana Ranaut : कंगना रणौतचा हॉरर कॉमेडी 'चंद्रमुखी २'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details