महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Varun Tej-Lavanya Tripathi wedding: वरुण तेज आणि लावण्याच्या कॉकटेल पार्टीत रामचरणसह अल्लु अर्जुनची धमाल - वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी विवाह कॉकटेल पार्टी

Varun Tej-Lavanya Tripathi wedding: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुंदर कपल वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी इटलीमध्ये टस्कीन शहरात डेस्टीनेशन वेडिंग करत आहेत. यासाठी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार मंडळी वऱ्हाडी म्हणून दाखल झाली आहेत. 1 नोव्हेंबरला पार पडत असलेल्या या विवाहात काल कॉकटेल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राम चरण, अल्लु अर्जुनसह स्ट्र्सनी धमाल मस्ती केलीय.

Varun Tej Lavanya Tripathi wedding
वरुण तेज आणि लावण्या कॉकटेल पार्टी

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 12:34 PM IST

मुंबई - Varun Tej-Lavanya Tripathi wedding: साऊथ स्टार वरुण तेज आणि अभिनेत्री लावण्य त्रिपाठी विवाह बंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसापासून या लग्नाची चर्चा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये टॉक ऑफ द टाऊन बनली होती. या विवाहसोहळ्यासाठी वधू आणि वर इटलीतील टस्कनी शहरात दाखल झालेत. हे एक डेस्टिनेशन वेडिंग असेल. यासोहळ्याला वऱ्हाडी म्हणून आरआरआर स्टार राम चरण, पुष्पा स्टार अल्लु अर्जुन, पवन कल्याण आणि नितीनसह सर्व दाक्षिणात्य स्टार्स हजर आहेत. गेल्या चारपाच दिवसापासून ही स्टार मंडळी धमाल, मजा मस्ती करण्याच्या लगीनघाई गुंतलेत.

दरम्यान, काल रात्री इटलीत वरुण-लावण्याची कॉकटेल पार्टी झाली. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कॉकटेल पार्टीमध्ये राम चरण डॅशिंग दिसत आहे. वरुण-लावण्याच्या कॉकटेल पार्टी लूकबद्दल बोलायचं झाल्यास, वरुणने काळ्या पँटवर क्रीम रंगाचा कोट असलेला दुहेरी रंगाचा टक्सिडो परिधान केलाय. तर लावण्यानं तिच्या भावी पतीच्या कोटशी मॅचिंग होणारा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. वरुण आणि लावण्या या सुंदर पोशाखात राजा-राणीच्या जोडीपेक्षा कमी दिसत नाहीत. त्याचवेळी राम चरण वरुण तेजच्या वेशभूषेत सुंदर दिसत आहे. राम चरणची पत्नी उपासना हिने काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केलाय.

लग्नासाठी संपूर्ण कुटुंबासह इटलीला पोहोचलेला पुष्पा स्टार अल्लु अर्जुन या कॉकटेल पार्टीत वेगळ्या आणि डॅशिंग लूकमध्ये दिसला. तो काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी हिने चमकदार राखाडी रंगाचा ड्रेस परिधान करुन सुंदर दिसत आहे. १ नोव्हेंबरला म्हणजे करवा चौथच्या सणाच्या दिवशी सात फेरे घेऊन वरुण आणि लावण्य कायमचे एकत्र येणार आहेत.

वरुण आणि लावण्य यांची प्रेमकहाणी 2017 मध्ये तेलुगु चित्रपट 'मिस्टर'च्या सेटवर सुरू झाली. त्यांची सुरुवातीची मैत्री हळूहळू प्रेमाच्या नात्यात बहरली. दोन्ही कलाकार तेलुगू चित्रपट उद्योगातील सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत. वरुण तेज अभिनेता आणि निर्माता नागेंद्र बाबू यांचा मुलगा आणि ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचा पुतण्या आहे. त्याच्या चुलत भावांमध्ये अभिनेता राम चरण, अल्लू अर्जुन, अल्लू सिरिश, साई तेज आणि पंजा वैष्णव तेज यांचा समावेश आहे. वरुणने 2014 मध्‍ये मुकुंदा या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्याला फिदा, कांचे, लोफर, एफ3: फन अँड फ्रस्ट्रेशन आणि इतर अनेक चित्रपटांमुळे प्रसिद्धी मिळालीय.

लावण्य त्रिपाठी ही तेलगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख अभिनेत्री आहे. दूसुकेल्था, तामिळ चित्रपट ब्रामन आणि हॅपी बर्थडे यांसारख्या चित्रपटांमध्ये तिनं साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

हेही वाचा -

1. Ankita Lokhande Broke Silence : सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअपच्या विषयावर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन

2.Kennedy received a standing ovation : 'मामी'मध्ये सनी लिओनीच्या 'केनेडी'ला मिळाले स्टँडिंग ओव्हेशन!

3.Fighter Last Shoot : हृतिक रोशन स्टारर 'फायटर' चित्रपटाचं शूटिंग लवकरच होणार पूर्ण...

ABOUT THE AUTHOR

...view details