महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

वरुण तेजनं वाघा बॉर्डरवर लॉन्च केले 'वंदे मातरम' गाणे, गाण्यासह टीझरलाही मिळतोय उदंड प्रतिसाद - Varun Tej Operation Valentine

Vande Mataram song launched on Wagah boarder : अभिनेता वरुण तेजने त्याच्या आगामी 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटातील 'वंदे मातरम' गाणे लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे हे गाणं त्यांनी वाघा बॉर्डरवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत लॉन्च केले. यावेळी त्यानं बीएसएफ जवानांशी संवादही साधला.

Vande Mataram song launched on Wagah boarder
वरुण तेजनं वाघा बॉर्डरवर लॉन्च केले 'वंदे मातरम' गाणे

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 4:07 PM IST

अमृतसर - Vande Mataram song launched on Wagah boarder : अभिनेता वरुण तेजने बुधवारी अमृतसरमधील वाघा बॉर्डरला भेट दिली आणि तेथे त्याच्या आगामी 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटातील 'वंदे मातरम' गाणे लॉन्च केले. वरुणचे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी स्वागत केले. यावेळी जवानांशी संवाद साधताना वरुण खूप भारावला होता. हे गाणे हिंदी, तेलुगू या भाषेत तयार झाले असून तेलुगूमध्ये अनुराग कुलकर्णी यांनी गायले आहे तर, हिंदी आवृत्तीला सुखविंदर सिंगने आपला आवाज दिला आहे. मिकी जे मेयर हे या गाण्याचे संगीत दिग्दर्शक आहेत.

'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' या चित्रपटात वरुण तेज एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत आहे. निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटाच्या टीझरचे लॉन्चिंग केले आणि त्याला प्रेक्षकांकडून भरपूर प्रशंसा मिळत आहे. टीझरला मिळालेल्या प्रेमाबद्दल वरुण म्हणाला, "आमच्या 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' ट्रेलरला मिळालेल्या अतुलनीय प्रतिसादाने मी खरोखरच भारावून गेलो आहे. ज्यांनी आम्हाला इतके प्रेम आणि भरभरुन पाठिंबा दर्शवला त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटात असलेला थरार, भावना आणि तीव्रता अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि मी तो तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यास उत्सुक आहे. तुमचे प्रेम आणि उत्साह मला प्रेरित करते आणि मी वचन देतो की 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'ची प्रतीक्षा करणे योग्य असणार आहे."

'फर्स्ट स्ट्राइक' शीर्षक असलेल्या टीझरमध्ये वरुणच्या तोंडी असलेल्या जोरदार संवादांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. आपल्या देशाच्या शत्रूंना आठवण करुन देताना एका ठिकाणी वरुण तेज म्हणतो, "ये देश गांधीजी के साथ साथ सुभाषचंद्र बोस का भी है." टीझरमध्ये डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या हवाई कसरती, थरारक युद्ध प्रसंग आणि पराक्रमी एअरफोर्स जवानांचे साहस दिसते.

'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाची कथा आघाडीवर असलेल्या आपल्या हवाई दलातील वीरांच्या पराक्रमाभोवती फिरते आणि राष्ट्राचे रक्षण करताना त्यांना येणाऱ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. सत्य घटनांनी प्रेरित असलेला, 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' हा चित्रपट देशभक्तीपर, सर्वांगीण मनोरंजन करणारा सिनेमा आहे. यामध्ये वरुण तेज याने अर्जुन देव आणि मानुषी छिल्लर यांनी रडार ऑफिसरची भूमिका साकारली आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाचे दिग्दर्शन शक्ती प्रताप सिंह हाडा यांनी केले आहे.

हेही वाचा -

  1. 'भक्षक' चित्रपटात भूमी पेडणेकर दिसेल एका शोध पत्रकाराच्या भूमिकेत
  2. अर्पिता खाननं नवीन वहिनी शुरा खानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  3. आनंद महिंद्रांनी केले '12 Th फेल'चे कौतुक, विक्रांत मॅसी राष्ट्रीय पुरस्कारास पात्र असल्याचे दिला निर्वाळा

ABOUT THE AUTHOR

...view details