मुंबई : तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध असलेले अभिनेते वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांनी शुक्रवारी हैदराबादमध्ये साखरपुडा केला . या सोहळ्याला वरुणच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित असून यावेळी सेलिब्रिटीमध्ये अल्लू अर्जुन, राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना कोनिडेला याशिवाय मेगास्टार चिरंजीवी उपस्थित होते. वरुणने इंस्टाग्रामवर साखरपुड्यातील फोटो शेअर करत लिहले, 'माझे प्रेम सापडले!' तसेच गेल्या काही दिवसांपासून वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांच्या अफेअरच्या चर्चा होत होत्या. मात्र आता साखरपुडा झाल्यानंतर या चर्चेला पूर्ण विराम भेटला आहे. या दोघांनीही आपले नाते कधीच स्वीकारले किंवा नाकारले नव्हते. बऱ्याच दिवस त्यांनी डेट केल्यानंतर अखेर त्यांनी साखरपुड्याची घोषणा केली.
साखरपुड्याची केली होती घोषणा : साखरपुड्याच्या घोषणेमध्ये त्यांनी लिहिले होते, 'दोन ह्रदये, एक प्रेम. मेगा प्रिन्स वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांचे हार्दिक अभिनंदन, . आयुष्यभर सोबत आनंदात राहण्याच्या तुम्हाला शुभेच्छा. 9 जून 2023. अशी या पोस्टमध्ये तारीख दिली होती. वरुण तेज हा अभिनेता-निर्माता नागेंद्र बाबू यांचा मुलगा आहे. तो चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचा पुतण्या आहे. लावण्य त्रिपाठीने 2012 मध्ये आलेल्या 'अंदला राक्षसी' या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. वरुण आणि लावण्यने आतापर्यंत दोन चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे.