मुंबई- वरुण धवन आणि कियारा अडवाणी त्यांच्या आगामी 'जुग जुग जीयो' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. या दोघांनी नुकतेच त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेट्रोमधून प्रवास करीत लोकांची मने जिंकली. अनिल कपूर सोबत, कियारा आणि वरुण हे मुंबई मेट्रोने प्रवास करताना दिसले.
एका व्हिडिओमध्ये, हे दोघे मेट्रोच्या आत वडापावचा आस्वाद घेताना दिसत आहेत. यात ते अस्सल मुंबईकर वाटत होते. किंबहुना, वरुणला त्याचा मेट्रोचा छोटासा प्रवास खरोखरच आवडला. तो म्हणाला की गर्दीच्या वेळेत वेळ वाचवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मेट्रोने प्रवास करणे. वरुणने इनफॉर्मल गुलाबी टी-शर्ट आणि डेनिम घातला होता तर कियारा पांढर्या टँक टॉपमध्ये सुंदर दिसत होती.