महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

वरुण धवन आणि रॅपर बादशाहचा गर्मी गाण्यावरील धमाल व्हिडिओ व्हायरल - डिझायनर कुणाल रावल

वरुण धवन आणि रॅपर बादशाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये वरुण आणि बादशाह डिझायनर कुणाल रावलच्या प्री वेडिंग कार्यक्रमात ते स्टेजवर स्ट्रीट डान्सर 3D चित्रपटामधील गर्मी या गाण्यावर धुमाकुळ घालताना दिसत आहे.

वरुण धवन आणि रॅपर बादशाह
वरुण धवन आणि रॅपर बादशाह

By

Published : Aug 27, 2022, 3:54 PM IST

मुंबईडिझायनर कुणाल रावलच्या ( Kunal Rawal wedding function) लग्नाच्या कार्यक्रमात वरुण धवनने ( Varun Dhawan ) त्याच्या गर्मी गाण्यावर अप्रतिम डान्स मूव्हमेंट्स दाखवल्या. त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, वरुण त्याच्या स्ट्रीट डान्सर 3D ( movie Street Dancer 3D ) चित्रपटातील गर्मी ( Garmi song ) गाण्यातील सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे तर रॅपर गायक बादशाह स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे.

यावेळी वरुण धवनने पांढरा कुर्ता पायजामा परिधान केला होता. बादशाह आणि वरुणने आपल्या अभिनयाने मंचावर धमाल उडवून दिली. हा व्हिडिओ रितिक भसीनने शुक्रवारी त्याच्या इन्स्टा स्टोरीजवर शेअर केला होता. हा आकर्षक साउंडट्रॅक नेहा कक्कर, बादशाह यांनी गायला आहे जो बादशाहने संगीतबद्ध केला आणि लिहिला आहे. या गाण्यात वरुणसोबत नोरा फतेही होती.

वरुण त्याची पत्नी नताशा दलालसोबत कुणाल रावलच्या प्रीवेडिंग फंक्शनला उपस्थित होता. हे कपल व्हाइट एथनिक आउटफिटमध्ये दिसले. कुणालचा प्री वेडिंग पार्टी हा स्टार-स्टड इव्हेंट होता. यावेळी अर्जुन कपूर, करण जोहर, अनिल कपूर, वरुण धवन पत्नी नताशा दलाल, जान्हवी कपूर, शनाया कपूर, महीप कपूर, संजय कपूर, रकुलसह मलायका अरोरा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी स्पॉट झाले होते. प्रीत सिंग तिच्या प्रियकर जॅकी भगनानी आणि इतर अनेकांसह हजर होती. वृत्तानुसार डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता 28 ऑगस्ट रोजी एका इंटिमेट लग्नसोहळ्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

वरुणच्या डान्स व्हिडिओशिवाय बी टाऊनचे जोडपे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर शाहरुख खान स्टारर 'दिल से' चित्रपटातील मलायकाच्या हिट छैय्या छैय्या गाण्यावर थिरकताना दिसले आणि त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कामाच्या आघाडीवर वरुणने नुकताच बॉक्स ऑफिसवर ‘जुग जुग जीयो’ हा चित्रपट दिला. या वर्षी जूनमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जवळपास 85 कोटींचा व्यवसाय केला होता. कियारा अडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट आता Amazon Prime वर उपलब्ध आहे. तो जान्हवी कपूरसोबत 'बवाल'मध्ये दिसणार आहे. त्याचासोबत क्रिती सेनॉनसोबत भेडिया हा चित्रपट देखील आहे.

हेही वाचा -Video Viral अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचा छैय्या छैय्यावर डान्स

ABOUT THE AUTHOR

...view details