मुंबई - Varun Dhawan's Dulhaniya 3 : अभिनेता वरुण धवननं 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' यांसारख्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता तो 2024 मध्ये पुन्हा एकदा 'वरा'ची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. वरुण धवन स्टारर 'दुल्हनिया 3'चं शूटिंग 2024 च्या अखेरीस सुरू होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहेत. वरुणची आलिया भट्ट यांच्यासोबत 'दुल्हनिया' फ्रँचायझी खूप हिट झाली आहे. 'दुल्हनिया 3' या चित्रपटासाठी करण जोहर देखील खूप उत्साहित आहे. रिपोर्ट्सनुसार, वरुण धवन वडील डेव्हिड धवन आणि रमेश तौरानी निर्मित या आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करत आहे.
वरुण धवनचा आगामी चित्रपट :सध्या हातात असलेल्या व शीर्षक ठरले नसलेल्या चित्रपटांच शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो 'दुल्हनिया 3' चित्रपटाचं शूटिंग करेल. रमेश तौरानीसोबतचा वरुणचा आगामी चित्रपट टिप्स एंटरटेनमेंट बॅनरखाली निर्मित होत आहे. त्याचा हा चित्रपट 2025 च्या सुरुवातीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं शुटिंग भारतात आणि परदेशात केलं जाणार आहे. वरुणच्या आगामी चित्रपटामध्ये दोन अभिनेत्री असू शकतात, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटामध्ये काही विनोदी कलाकारही असतील. रमेश तौरानीच्या या चित्रपटाचं शीर्षक समोर आलेलं नाही.