महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Valentine Day Song : घर बंदूक बिरयानीमधील पहिल्या प्रेमाची चाहूल देणारं पहिलं गाणं 'गुन गुन' प्रदर्शित! - नागराज पोपटराव मंजुळे

घर बंदूक बिरयानी' चित्रपटामधील प्रेमाची चाहूल देणार पहिलं गाणं, 'गुन गुन' प्रदर्शित करण्यात आलं आहे. आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांनी गायलेल्या या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे आहेत. 'गुन गुन' या प्रेमगीताच्या माध्यमातून आकाश ठोसर आणि नवा चेहरा सायली पाटील या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज या गाण्यातून बघायला मिळतोय.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Feb 14, 2023, 8:43 PM IST

Updated : Feb 15, 2023, 9:01 AM IST

मुंबई - व्हॅलेंटाईन डे च्या आसपास अनेक प्रेमगीतं प्रदर्शित होत असतात. आता याच डे चा मुहूर्त साधत, व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला, 'घर बंदूक बिरयानी' मधील प्रेमाची चाहूल देणार पहिलं गाणं, 'गुन गुन' प्रदर्शित करण्यात आलं आहे. आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांनी गायलेल्या या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे आहेत. 'गुन गुन' या प्रेमगीताच्या माध्यमातून आकाश ठोसर आणि नवा चेहरा सायली पाटील या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज या गाण्यातून बघायला मिळतोय.

या गीताबाबत संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणाले, "नागराज मंजुळे यांच्या सिनेमातील रोमँटिक गाणी ही नेहमीच मनाला भिडणारी असतात. गाण्याची प्रत्येक फ्रेम सुंदर असते. एका अनोख्या पद्धतीने गाण्यांचे चित्रीकरण केले जाते, जे नजरेला सुखावणारे असते. त्यामुळे त्या गाण्याच्या शब्दांना अधिक श्रवणीय करण्याचा मी प्रयत्न केला आहे. प्रेमाची एक वेगळीच गंमत त्यांच्या गाण्यात अनुभवायला मिळते. प्रेमात एक वेगळीच जादू असते, ती जादू पुन्हा एकदा आपल्याला या 'गुन गुन' या प्रेमगीतातून अनुभवता येणार आहे.''

नागराज पोपटराव मंजुळे म्हणाले, 'ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी या चित्रपटातील संगीतासाठी मागील चार वर्षांपासून प्रचंड मेहनत घेतली आहे. जीव ओतून काम केलं आहे. मला असं वाटतं, कोणत्याही चित्रपटाचा संगीत हा आत्मा असतो. ज्या गोष्टी कथेतून सांगता येत नाहीत त्या संगीतातून व्यक्त होतात आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी मनापासून केला आहे. मला खात्री आहे, प्रेक्षक हे गाणं नक्कीच गुणगुणतील.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या आगामी त्याच्या 'घर- बंदूक- बिरयानी' या चित्रपटाचा टिझर यापूर्वी प्रसिध्द झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नागराजच्या 'आटपाट' प्रॉडक्शनच्या नव्या सिनेमात स्वतः नागराज भूमिका करणार असून 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि प्रसिध्द अभिनेता सयाजी शिंदे यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत.

नागराजने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टिझर काही दिवसापूर्वी प्रसिध्द केला होता. टिझरची सुरुवात जंगलातील धमाक्याने होते. पोलीस आणि गुढ डाकू यांच्यात संघर्ष, चमकमक दिसते. परंतु ते लोक कोण आहेत याचा उलगडा झालेला नाही. 'घर- बंदूक- बिरयानी' असे वेगळे शीर्षक असलेल्या या चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा हा चित्रपट आहे हे टिझरवरुन निश्चित वाटत आहे.झी स्टुडिओज आणि नागराजची हा चित्रपट संयुक्त निर्मिती असणार आहे. या चित्रपटाचे संगीतकार आहेत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र. त्यांनी यापूर्वी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत जंगल औताडे यांनी केले आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे.

'घर बंदूक बिरयाणी' मध्ये सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख आहेत आणि हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा -Javed Khan Amrohi passed away : लगान फेम ज्येष्ठ अभिनेता जावेद खान अमरोही यांचे निधन

Last Updated : Feb 15, 2023, 9:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details