महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Valentine's Day Mood Song : अभिनेत्री शक्ति मोहन आणि हिमांश कोहलीच्या दायें बायें गाण्याने सेट केला व्हॅलेंटाईन डेचा मूड - शक्ती मोहन आणि अभिनेता हिमांश कोहली

व्हॅलेंटाईन डे वर अनेक नवीन गाणी रिलीज करण्यात आली आहेत. त्यापैकी एक नृत्यदिग्दर्शक शक्ती मोहन आणि बॉलीवूड अभिनेता हिमांश कोहली यांचे नवीन 'दायें बायें' हे एक आहे. शक्ती मोहन आणि हिमांशच्या या गाण्याने व्हॅलेंटाईन डेचा मूड सेट केला आहे. त्याचवेळी प्रणव मोहनलालचा मल्याळम चित्रपट 'हृदयम' व्हॅलेंटाइन डेला पुन्हा प्रदर्शित होत आहे.

Valentine's Day Mood Song
Valentine's Day Mood Song

By

Published : Feb 14, 2023, 12:25 PM IST

मुंबई- कोरिओग्राफर शक्ती मोहन आणि अभिनेता हिमांश कोहली यांचा नवीन सहयोग असलेले दायें बायें हे गाणे सोमवारी रिलीज झाले. या गाण्यातून व्हॅलेंटाईन-डेचा मूड उत्तम प्रकारे सेट केला गेला आहे. हे प्रणय आणि गंमतीने भरलेले असून रोमान्ससाठी आशादायक वातावरण निर्माण करणारे आहे. छान शूट लोकेशन्स आणि मस्त हुकस्टेप्स व्हिडिओची मजा वाढवतात. त्याचवेळी, प्रणव मोहनलालचा मल्याळम चित्रपट 'हृदयम' देखील व्हॅलेंटाईन डेला पुन्हा रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या गाण्याबद्दल बोलताना हिमांश म्हणाला, 'प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून मी खूप रोमांचित आहे. हा ट्रॅक एका सुंदर ठिकाणी शूट करण्यात आला आहे आणि मी शूटचा खूप आनंद घेतला. आता मी फक्त माझ्या चाहत्यांच्या आणि हितचिंतकांच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची वाट पाहत आहे.

गोल्डी सोहेलने संगीतबद्ध केलेले हे गाणे यासर देसाईने गायले आहे आणि रोमँटिक कव्वाली फ्लेवर आहे. शक्ती मोहन म्हणाली, 'हे मजेदार होते आणि आम्ही त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. हा व्हॅलेंटाईनचा मूड आहे आणि हे प्रेमाने भरलेले गाणे माझ्या रसिक चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी यापेक्षा चांगला प्रसंग असूच शकत नाही.' सारेगामाच्या यूट्यूब चॅनलवर 'दायें बायें' हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

'हृदयम्' व्हॅलेंटाईन डेला पुन्हा रिलीज होण्यासाठी सज्ज - प्रणव मोहनलालचा मल्याळम हिट चित्रपट 'हृदयम', ज्याने थिएटरमधून 50 कोटी रुपये कमवले आहेत, ते पुन्हा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचे निर्माते वैशाख सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हॅलेंटाईन डेला निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी 21 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता, आणि मामूट्टीच्या भीष्मपर्वम आणि पृथ्वीराज सुकुमारनच्या जन गण मन सोबत केरळमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्यांपैकी एक होता. चित्रपटाचे दिग्दर्शक विनीत श्रीनिवासन यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती शेअर केली होती. की, ज्यामध्ये म्हटले आहे: हृदयम परत येत आहे. या चित्रपटात कल्याणी प्रियदर्शन आणि दर्शना राजेंद्रन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आणि लोकप्रिय अपील आणि सौंदर्यविषयक मूल्यासह सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी केरळ राज्य पुरस्कार जिंकला. आता तो व्हॅलेंटाईन डे ला पुन्हा रिलीज होत असताना कोची, तिरुवनंतपुरम, कोईम्बतूर आणि इतर काही ठिकाणी प्रदर्शित केला जाईल. चित्रपटाचे हिंदी, तेलुगू आणि तमिळ हक्क धर्मा प्रॉडक्शन आणि फॉक्स स्टार स्टुडिओलाही विकले गेले. हे सध्या Disney Plus Hotstar वर स्ट्रीम केले जात आहे.

हेही वाचा -Stars Meet Pm Narendra Modi : यश, ऋषभ शेट्टी, श्रद्धा जैनसह कन्नड स्टार्सनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details