हैदराबाद - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे. उर्वशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या पोस्ट्समुळे ती सतत चर्चेत असते. आता अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्री साऊथ मेगास्टार चिरंजीवीसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये उर्वशीच्या चेहऱ्यावर मोठे हास्य आहे. उर्वशीने या पोस्टमध्ये एक छान कॅप्शनही दिले आहे. विशेष म्हणजे उर्वशी दक्षिणेतील अभिनेता चिरंजीवीच्या चित्रपटात दिसणार आहे.
उर्वशीची पोस्ट काय आहे?- उर्वशीने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, 'जेव्हा मी पुरस्कार जिंकते, तेव्हा मी माझ्या आई-वडिलांचा विचार करते. माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट असणे म्हणजे विविध देश आणि विश्वात हे सिध्द होणे आहे. मेगास्टार चिरंजीवी गारुंचे आभार."
उर्वशी दिग्दर्शक बॉबी कोलीच्या आगामी अॅक्शन पॅक्ड चित्रपट 'वलतेर वीरैया'मध्ये आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे. हे आयटम साँग दक्षिणेतील प्रसिद्ध संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केले आहे. त्याचबरोबर उर्वशीला कोरिओग्राफर शेखर मास्तर यांनी या गाण्याच्या तालावर स्टेप्स शिकवल्या आहेत. हे गाणे हैदराबादमधील एका खास लोकेशनवर शूट करण्यात आले आहे.