महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

इराणी महिला आंदोलनाला पाठींबा म्हणून उर्वशी रौतेलाने कापले केस, नेटिझन्स उडवताहेत खिल्ली - इराणी महिलांना सेलेब्रिटींचा पाठींबा

सोमवारी उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती तिचे केस कापताना दिसत आहे. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर झालेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर तिने अशी कृती करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांशी लढत असलेल्या इराणी महिलांना उर्वशीने पाठींबा दर्शवला आहे.

इराणी महिला आंदोलनाला पाठींबा म्हणून उर्वशी रौतेलाने कापले केस
इराणी महिला आंदोलनाला पाठींबा म्हणून उर्वशी रौतेलाने कापले केस

By

Published : Oct 17, 2022, 12:18 PM IST

मुंबई - उर्वशी रौतेलाने स्वतःला ऑनलाईन गुंडगिरीचा बळी असल्याचे म्हणत तिने महसा अमिनशी स्वतःची तुलना केली आहे. महसा अमिनच्या मृत्यूनंतर इराणमध्ये आंदोलन करणाऱ्या महिला आणि मुलींना पाठींबा देण्यासाठी उर्वशी रौतेलाने स्वतऋचे केस कापले आहेत.

सोमवारी उर्वशीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती तिचे केस कापताना दिसत आहे. तिने फोटोसोबत एक मेसेज लिहिला - "माझे केस कापले! इराणी मोरॅलिटी पोलिसांनी आणि सर्व मुलींसाठी महसा अमिनीच्या मृत्यूच्या निषेधार्थ मारल्या गेलेल्या इराणी महिला आणि उत्तराखंडमधील अंकिता भंडारी या १९ वर्षीय मुलीसाठी माझे केस कापत आहे.

"जगभरातील महिला केस कापून इराण सरकारच्या विरोधात एकवटत आहेत. महिलांचा आदर करा. महिला क्रांतीचे जागतिक प्रतीक. केसांकडे महिलांच्या सौंदर्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. सार्वजनिक ठिकाणी केस कापून, महिला ते समाजाच्या सौंदर्य मानकांची पर्वा करत नाहीत आणि कसे कपडे घालायचे, कसे वागायचे किंवा कसे जगायचे हे इतरांना ठरवू देत नाहीत. एकदा स्त्रिया एकत्र आल्या आणि एका स्त्रीच्या समस्येचा संपूर्ण स्त्रीजातीचा प्रश्न मानला की स्त्रीवादाला एक नवीन जोमा मिळेल." असे उर्वशी म्हणाली.

उर्वशीने हे फोटो शेअर केल्यानंतर लगेचच, नेटिझन्स यांनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी ती तिरुपतीला बालाजी मंदिरात भावासोबत गेली होती. त्यावेळी तिने मंदिरात केस कापले होते व हेच फोटो ती आत्ता पोस्ट करत इसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सोमवारी उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती तिचे केस कापताना दिसत आहे. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर झालेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर तिने अशी कृती करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. इराणी महिला नैतिकतेच्या पोलिसांशी लढत असल्याने त्यांनी त्यांना पाठिंबा दिला.

उर्वशी सध्या ऑस्ट्रेलियात आहे आणि ती तिते ऋषभ पंतसाठी गेली असल्याचा तर्क नेटिझन्सनी लावला आहे. नेटिझन्स तिला "ऋषभ पंतचा पाठलाग" केल्याबद्दल क्रूरपणे ट्रोल करत आहेत. तत्पूर्वी, तिने इन्स्टाग्रामवरर आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये लोकांना तिने "गुंडगिरी" थांबवण्यास सांगितले. पण लोकांनी तिला पुन्हा ट्रोल केल्यानंतर तिने स्वतःची तुलना इराणमध्ये अत्याचाराचा बळी ठरलेल्या महसा अमिनीशी केली आहे.

कोण आहे महसा अमिनी - महसा अमिनी या इराणी तरुणीला 13 सप्टेंबर रोजी तेहरानमध्ये "अयोग्य" पोशाख केल्याबद्दल अटक करण्यात आली होती आणि तीन दिवसांनी कोठडीत असताना तिचा मृत्यू झाला. त्यानंतर जगभर तिच्या या मृत्यूबद्दल प्रतिक्रिया उमटत आहे. महसा अमिनीला न्याय मिळावा यासाठी इराणमध्ये महिला आंदोलन करत आहेत.

महसा अमिनीसाठी आंदोलन - महसा अमिनीच्या मृत्यूमुळे निदर्शने झाली आणि सुरक्षा दलांशी चकमक झाली ज्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. नॉर्वेस्थित इराण ह्युमन राइट्स (IHR) या एनजीओच्या म्हणण्यानुसार, महसा अमिनीच्या मृत्यूच्या निषेधार्थ देशभरात झालेल्या निदर्शनेमध्ये 100 हून अधिक लोक मारले गेले आहेत. अमिनीच्या मृत्यूच्या निषेधार्थ इराणी शाळकरी मुली आणि महिलांनी त्यांचे हिजाब काढून आणि रॅली काढून निदर्शने मोठ्या संख्येने केली आहेत.

या पार्श्वभूमीवर उर्वशी रौतेलाने स्वतःची तुलना महसा अमिनीशी केली आहे. तिने गेल्या आठवड्यात तिचा एक व्हिडिओ अपलोड केला आणि लिहिले, "पहिल्यांदा इराणमध्ये # महसाआमिनी आणि आता भारतात.... माझ्यासोबत असे घडत आहे की ते मला स्टॅकर म्हणून धमकावत आहेत??? कोणीही माझी काळजी करत नाही. मला आधार द्या." ती पुढे म्हणाली, "एक सशक्त स्त्री ती असते जी मनापासून अनुभवते आणि मनापासून प्रेम करते. तिचे अश्रू तिच्या हसण्याइतकेच विपुल प्रमाणात वाहतात. ती मऊ आणि शक्तिशाली, व्यावहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही आहे. ती जगाला एक भेट आहे."

हेही वाचा -Tv Actress Suicide : अभिनेत्री वैशाली ठक्करने का आत्महत्या केली? चिठ्ठीतून सत्य आले बाहेर

ABOUT THE AUTHOR

...view details