महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Urfi Javed Bandra Police Station Video : उर्फी जावेदचा वांद्रे पोलिस स्टेशनमधील व्हिडिओ झाला व्हायरल; पहा व्हिडिओ... - urfi Javed visit mumbai bandra police station

Urfi Javed Bandra Police Station Video : उर्फी जावेदचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती वांद्रे पोलिस स्टेशनमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी ती खूप गंभीर दिसत आहे.

Urfi Javed Bandra Police Station Video
उर्फी जावेदचा वांद्रे पोलिस स्टेशनमधील व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 5:43 PM IST

मुंबई - Urfi Javed Bandra Police Station Video :अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. दरम्यान आता उर्फीनं वांद्रे पोलीस स्टेशन गाठलं आहे. उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये खूप गंभीर दिसत आहे. उर्फी जावेद सोमवारी सकाळी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली, तेव्हा मीडियाची गर्दी झाली होती. उर्फीला तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे आणि आउटफिट्ससाठी ओळखल्या जाते. यावेळी पापाराझीनं तिला स्टेशनवर येण्याचे कारण विचारले तेव्हा तिनं सांगितलं, की 'काय सांगू, मी काही बोलू शकत नाही'. व्हिडिओमध्ये उर्फी जावेदनं फाटलेला जीन्स घातला होता. उर्फीनं फाटलेल्या जीन्सवर ऑलिव्ह ग्रीन ब्लेझर घातले होते. उर्फी जावेदच्या ब्लेझरच्या मागे 'कॅचिंग द डॉन...' असे लिहिलं होतं.

उर्फी जावेद वांद्रे पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना :सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद वांद्रे पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना दिसत आहे. उर्फीला तिच्या फॅशनसाठी सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते. मात्र, उर्फी जावेदही ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देताना देखील दिसते. ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. यापूर्वी उर्फी जावेदनं स्वत: कारमध्ये बसलेला एक फोटो शेअर केले होता या फोटोवर देखील अनेकजणांनी टीका केली होती. या फोटोवर कॅप्शन देत तिनं लिहलं होतं, 'मजेची गोष्ट म्हणजे लोकांना वाटते की हा माझ्या पोशाखाचा एक भाग आहे. उर्फीनं कॅप्शनसह हसणारा इमोजी देखील यावर पोस्ट केला होता.

उर्फीचे नाव स्टार्समध्ये लोकप्रिय : उर्फी जावेद सामान्य जीवनातील गोष्टींचा वापर करून पोशाख डिझाइन करते आणि तिच्या असामान्य पोशाखांसाठी ओळखली जाते. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगपासून ते उद्योगपती राज कुंद्रापर्यंत, स्टार तिचे नाव घेतात. तिला रणवीरसोबत पुन्हा लग्न करावेसे वाटते असं तिनं एकदा म्हटलं होत. त्यानंतर ती खूप चर्चेत आली होती. बिग बॉस ओटीटीचा एक भाग असलेली उर्फी जावेद सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.

हेही वाचा :

  1. Bigg Boss 10 : 'बिग बॉस कन्नड'च्या 10व्या सीझनमधील स्पर्धक वरथूर संतोषला झाली अटक ; जाणून घ्या काय आहे प्रकरण...
  2. Ganapath Box Office Collection Day 4 : टायगर श्रॉफ स्टारर 'गणपथ' बॉक्स ऑफिसवर कमाईच्याबाबतीत ठरला अपयस्वी...
  3. Tiger 3 Song Out : 'टायगर 3'च्या डान्स नंबरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफमध्ये दिसली जबरदस्त केमिस्ट्री...

ABOUT THE AUTHOR

...view details