मुंबई - Urfi Javed receives death threat :उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते, परंतु यावेळी तिच्या विचित्र कपड्यांमुळे ती अडचणीत आली आहे. यावेळी तिला फॅशन करणं चांगलंच महागात पडले असून तिला पोलीस ठाण्यातही जावं लागलं आहे. आपल्या कपड्यांच्या डिझाईन आणि नवीन फॅशननं स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या उर्फी जावेदला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. तिला हॅलोविनसाठी डिझाइन केलेल्या तिच्या एका पोशाखामुळे धमकी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिनं 'भूल भुलैया' चित्रपटातील राजपाल यादवसारखा 'छोटा पंडित'चा गेटअप केला होता.
उर्फी जावेदला मिळाली धमकी :उर्फीचा हा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर तिला अज्ञात व्यक्तीनं ईमेल करून धमकी दिली आणि तिला व्हिडिओ हटवण्यास सांगितले. हा व्हिडिओ डिलीट न केल्यास तिला ठार मारले जाईल, असेही धमकी दिली आहे. हा ईमेल मिळाल्यानंतर उर्फीने मुंबई पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर तिनं एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. उर्फीला दोन वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून ईमेल आले आहेत. पहिला ईमेल तिला निखिल गोस्वामी नावाच्या ईमेल आयडीवरून आला होता. या ईमेलमध्ये असं होत. 'तुम्ही अपलोड केलेला व्हिडिओ डिलीट करा, नाहीतर तुम्हाला मारायला वेळ लागणार नाही'. त्यानंतर तिला दुसरा ईमेल आला, जो रुपेश कुमार नावाच्या व्यक्तीच्या मेल आयडीवरून आला होता. या मेलमध्ये असं लिहलं होत, 'उर्फी जावेद आमच्या हिंदू धर्माची बदनामी करत आहे, तुझे जीवन जग, मी तुला चौकात गोळ्या घालीन' असं या ईमेलमध्ये आहे.