महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Urfi Javed : उर्फी जावेदनं 'भूल भुलैया' चित्रपटातील राजपाल यादवच्या छोटा पंडितच्या पात्राची केली कॉपी... - उर्फीनं केली राजपालच्या पात्राची कॉपी

Urfi Javed : उर्फी जावेदचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लूकमध्ये तिनं अक्षय कुमार स्टारर 'भूल भुलैया' चित्रपटातील राजपाल यादवच्या छोटा पंडितच्या पात्राची कॉपी केली आहे.

Urfi Javed
उर्फी जावेद

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 5:39 PM IST

मुंबई Urfi Javed : सोशल मीडियावर तिच्या असामान्य फॅशनने चर्चेत असलेल्या उर्फी जावेदचा लेटेस्ट लूक समोर आला आहे. तिचा हा पोशाख पाहून सगळेच थक्क झाले आहेत. उर्फी ही तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फीनं अक्षय कुमारच्या 'भूल भुलैया' या चित्रपटातील राजपाल यादवच्या छोटा पंडितसारखे लूक केले आहे. उर्फी जावेदनं तिच्या इन्स्टा हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिनं केशरी रंगाचे धोतर परिधान केले आहे. याशिवाय तिनं तिच्या चेहऱ्यावर लाल रंग लावला आहे. यावर तिनं तिच्या कानाजवळ अगरबत्ती लावली आहे. याशिवाय तिनं केसांचा अंबाडा बांधला आहे. तिच्या गळ्यात झेंडूच्या फुलांचा माळा दिसत आहे. या लकूमध्ये ती खूप वेगळी दिसत आहे.

'छोटा पंडित' लूकमध्ये दिसली उर्फी : उर्फी जावेद आता बॉलीवूड चित्रपटामधील काही पात्राचे लूक कॉपी करताना दिसत आहे. अलीकडेच, तिनं 'हेरा फेरी'तील बाबू भैय्याच्या पात्रच्या लूकची कॉपी केली होती. दरम्यान काही लोक उर्फीच्या आत्मविश्वासाची प्रशंसा सोशल मीडियावर करताना दिसत आहेत. आता तिचा 'छोटा पंडित'चा लूक समोर आल्यानंतर एका यूजरनं कमेंटमध्ये लिहलं, 'पुनीत सुपरस्टारची स्त्री आवृत्ती' दुसऱ्या एका यूजरनं लिहलं, 'भूल भुलैया पार्ट 3' आणखी एकानं लिहंल, 'खूप सुंदर लूक केले आहे'. याशिवाय काहीजणांनी तिला ट्रोल करत ती हिंदूच्या आस्थेबद्दल चेष्टा करत असल्याचे बोलत आहेत. याशिवाय काही यूजर्स या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहे. अनेकजण आता व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

उर्फी जावेदची पोस्ट : ही पोस्ट शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, पाणी. 'मला आशा आहे की छोटा पंडित हे भूल भुलैया मधील एक पात्र आहे हे सर्वांना माहित असेल. खूप मेहनतीनं हॅलोवीन पार्टीला तयार झाली होती, मात्र जाऊ शकली नाही, त्यामुळे आता वाटलं की हा व्हिडिओ पोस्ट करू. हा लूक तिनं हॅलोवीनसाठी केला होता. उर्फी जावेदला तिच्या अतरंगी स्टाईलमुळं अनेकजण सोशल मीडियावर फटकारताना दिसतात, मात्र तिला काहीच या गोष्टाचा फरक पडत नाही.

हेही वाचा :

  1. Indian 2 major update : कमल हासन स्टारर 'इंडियन 2'ची इंट्रो'सह पहिली झलक लवकरच मिळणार पाहायला
  2. Bigg Boss 17 Updates: 'बिग बॉस 17'मध्ये होणार आता धमाका ; प्रोमो झाला व्हायरल...
  3. Tejas Vs 12th Fail Box Office Clash: 'तेजस' चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला, 'ट्वेल्थ फेल' सिनेमाला समीक्षकांची पसंती

ABOUT THE AUTHOR

...view details