महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

इन्स्टाग्रामनं उर्फी जावेदला दिलं जीवदान; केला स्क्रीनशॉट शेअर - उर्फी जावेदचं अकाउंट सस्पेंड

Uorfi Jawed Post : अभिनेत्री उर्फी जावेदनं तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये तिचं अकाउंट सस्पेंड झाल्याचं दिसत आहे. मात्र हे अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

Uorfi Jawed Post
उर्फी जावेदची पोस्ट

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 3:02 PM IST

मुंबई - Uorfi Jawed Post : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी ड्रेसिंग सेन्ससाठी चर्चेत असते. उर्फी जावेद यावेळी ड्रेस किंवा तिच्या कोणत्याही वक्तव्यामुळं नाही, तर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटमुळं चर्चेत आली आहे. उर्फीचं सध्या इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. तिनं एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात इन्स्टाग्रामवर सस्पेंड झाल्याचं दिसत आहे. उर्फीचा हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मात्र उर्फीच्या अकाउंटवरील पोस्टही सध्या दिसत आहेत. म्हणजे काही वेळानंतरचं तिचं अकाउंट रिकव्हर करण्यात आलं आहे.

उर्फी जावेदचं इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड :इन्स्टाग्राम निलंबित केल्याच्या स्क्रीनशॉटमध्ये मेटानं बर्‍याच गोष्टी लिहिल्याचं दिसत आहेत. स्क्रीनशॉटमध्ये असं म्हटलं आहे की, समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केल्यामुळं तिचं इंस्टाग्राम निलंबित करण्यात आलं आहे. उर्फी जावेदचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. काहीजणांना उर्फीचा फॅशन सेन्स खूप आवडतो आणि काहीजण तिला अनेकदा ट्रोल करतात. उर्फी जावेदला अनेकवेळा गंभीर धमक्याही आल्या आहेत. उर्फीला आता ट्रोलचा त्रास होत नाही. अनेकदा ती ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देताना दिसते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया चाहत्यासोबत शेअर करत असते.

युजर्सनी उर्फी जावेदला पुन्हा ट्रोल केले : काही दिवसापूर्वी उर्फीचा एक फोटो व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ती बिकनी सूटमध्ये आहे. या फोटोवर अनेकजण कमेंट करून तिला ट्रोल करत आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका यूजरनं लिहिलं, 'तुला चांगले कपडे घालता येत नाही का ?' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'मला हे सर्व का पहावं लागत आहे, चांगल आहे मी आंधळा आहे'. याशिवाय आणखी एकानं लिहिलं, 'आता दाखवायचे काय उरले आहे?' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. उर्फीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अनेक मोठ्या डिझायनर्ससोबत काम करत आहे. अलीकडेच तिनं मसाबा गुप्तासोबत काम केलं होतं. याआधी ती अबू जानी आणि संदीप खोल्साची शो टॉपर बनली होती.

हेही वाचा :

  1. कर्करोगामुळं आजारी असणाऱ्या ज्युनियर मेहमूदची घेतली जॉनी लीव्हरनं भेट
  2. 'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई
  3. 'बिग बॉस 17'मध्ये खानजादीच्या मेंटल हेल्थवर 'जवान' अभिनेत्री रिद्धी डोगरानं केली पोस्ट शेअर

ABOUT THE AUTHOR

...view details