महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ram Charan's birthday bash : राम चरणच्या बर्थ डे पार्टीत उपासनाचा बेबी बंप फ्लॉंट, राजामौलीसह दिग्गज सेलेब्रिटींची मांदियाळी - आरआरआर चित्रपटाचा स्टार राम चरण

राम चरणने त्याचा 38 वा वाढदिवस त्याच्या जवळच्या कुटुंबासह आणि चित्रपटसृष्टीतील मित्रांसह साजरा केला. सोमवारी रात्री हैदराबादमध्ये त्यासाठी एक भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते ज्याला तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज तारे तारका उपस्थित होते.

राम चरणच्या बर्थ डे पार्टीत उपासना
राम चरणच्या बर्थ डे पार्टीत उपासना

By

Published : Mar 28, 2023, 11:57 AM IST

मुंबई - आरआरआर चित्रपटाचा स्टार राम चरण याचा सोमवारी वाढदिवस साजरा झाला. त्याने आपला वाढदिवस चित्रपटसृष्टीतील जवळचे कुटुंब आणि मित्र यांच्यासोबत साजरा केला. राम चरण नेहमी मीडियाच्या झगमगाटापासून दूर राहूनच आपला वाढदिवस करत असतो. यावेळी त्याने हैदराबादमध्ये एक भव्य पार्टी आयोजित केली होती. ज्याला तेलुगु फिल्म इंडस्ट्रीतील अनेकजण उपस्थित होते.

शहरातील एका लक्झरी हॉटेलमध्ये झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीत राम चरण पत्नी उपासना कोनिडेलासोबत पोहोचला होता. राम चरणने काळ्या रंगाचा सॅटीनचा शर्ट घातलेला दिसला. त्यावर त्याने मॅचिंग ट्राउझर्स आणि शूज घातले होते. तर त्याची गर्भवती पत्नी निळ्या पोशाखात बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली.

अक्किनेनी नागार्जुन त्याची पत्नी अमला अक्किनेनी आणि मुले नागा चैतन्य आणि अखिल अक्किनेनी यांच्यासोबत आला होता. अर्जुन रेड्डी स्टार विजय देवरकोंडा आणि जगपती बाबू देखील राम चरणच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दिसले होते. राम चरणची मगधीरा चित्रपटातील सह-अभिनेत्री काजल अग्रवालने तिचा व्यापारी पती गौतम किचलू याच्यासोबत पार्टीमध्ये उपस्थिती दर्शविली.

राम चरणच्या वाढदिवसाच्या पार्टीतील व्हायरल व्हिडिओंमध्ये दग्गुबती व्यंकटेश, राणा दग्गुबती हे देखील दिसत होते. दरम्यान, हा वाढदिवस सोहळा आरआरआर चित्रपटाच्या टीमसाठी पुन्हा एकत्र आणणारा होता. एसएस राजामौली त्यांच्या कुटुंबासह आले होती आणि एमएम कीरवानी यांनी देखील चरणच्या वाढदिवसाच्या समारंभात त्यांची उपस्थिती दर्शविली. राम चरणचे काका आणि अभिनेता-निर्माते नागा बाबू कोनिडेला देखील पार्टीत दिसले.

तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील सर्व दिग्गज राम चरणच्या वाढदिवसानिमित्य एकत्र आले होते. मात्र राम चरणचा आरआरआर चित्रपटातील सहकलाकार ज्यनियर एनटीआर मात्र हजर नव्हता. त्याने दुपारीच सोशल मीडियावरुन राम चरणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

राम चरणच्या फॅन क्लबने त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. अनेक शहरामध्ये त्याची पोस्टर्स लागली होती आणि केक कापून सेलेब्रिशन सुरू होते. त्याच्या वाढदिवसानिमित्य गेम चेंजर या त्याचा आगामी चित्रपटाचे पोोस्टर रिलीज झाल्यामुळे त्याचा चाहत्यांमध्ये अनोखा उत्साह संचारला होता.

हेही वाचा -Akanksha Dubey Suicide Case : ट्विटरवर रिप लिहिताच गायक समर सिंह ट्रोल, आकांक्षा दुबेच्या आईने केला गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details