महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Uorfi Javed latest look : पुन्हा एकदा उर्फी जावेद तिच्या आउटफिटमुळे चर्चेत - शल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद

उर्फी जावेदला पुन्हा तिच्या आउटफिटमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केले. मुंबईमध्ये शुक्रवारी रात्री एका कार्यक्रमात तिने अतरंगी पोशाख परिधान केला होता. यामुळे सर्वाच्या नजरा उर्फीवर खिळल्या होत्या.

Uorfi Javed
उर्फी जावेद

By

Published : May 20, 2023, 2:11 PM IST

मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. ती एक बिग बॉस ओटीटी स्टार आहे. प्रत्येकदा उर्फी अतरंगी पोशाख घालते. त्यामुळे तिला अनेकदा ट्रोलही केले जाते. मुंबईमध्ये शुक्रवारी रात्री एका कार्यक्रमात तिने अतरंगी पोशाख परिधान केला होता. यावेळी सर्वाच्या नजरा उर्फी कडे जात होत्या. या कार्यक्रमात तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता ज्यावर सर्वत्र कटआउट होते. तसेच तिने सोनेरी कानातले घातले होते. शिवाय तिने केसचा बन बांधला होता. या ड्रेसमध्ये उर्फी ही अतरंगी दिसत होती. मात्र चेहऱ्याच्या मेकअपमुळे ती दिसायला सुंदर दिसत होती.

पुन्हा एकदा उर्फी ड्रेसमुळे चर्चेत : पापाराझीने इंस्टाग्रामवर अकाऊंटद्वारे एका व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, उर्फी ब्लॅक कट-आउट ड्रेसमध्ये तिच्या सौंदर्याची प्रदर्शन करताना कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. नेटिझन्स मात्र उर्फीच्या लूकवर फारसे खूश नाहीत. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर लगेच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर कमेंट करणे सुरू केले. या लूकमुळे तिला ट्रोल केल्या जात आहे. तिच्या फॅशनच्या निवडीवर वापरकर्ते टीका करत आहे. एका वापरकर्त्याने तिला कमेंट केली की, 'कोई इज कुल्फी को दुसरे ग्रह पे भेज दो बोहत मेहरबानी होगी (कोणीतरी कृपया तिला दुसऱ्या ग्रहावर पाठवा) तर दुसरा म्हणाला, ऐसा हाल जब नेता इलेक्शन हार जाता है (तिचा पोशाख हरलेल्या राजकारण्याची आठवण करून देतो) असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

फॅशनच्या निवडीमुळे ट्रोल होते : उर्फी अनेकदा तिच्या फॅशनच्या निवडीमुळे ट्रोल होते. बरेचदा तिच्या अतंरगी लूकमुळे ती चर्चेत असते. शिवाय तिच्यावर अनेकदा टीकाही होतात. उर्फीच्या कामाबद्दल बोलायला गेले तर तिने 'कसौटी जिंदगी की' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' यासारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला प्रसिद्धी मिळाली. उर्फी अलीकडेच रिअ‍ॅलिटी टीव्ही शो स्प्लिट्सविला 14मध्ये मिस्चीफ मेकर म्हणून दिसली होती. तिला 'खतरों के खिलाडी'च्या आगामी सीझनसाठी बोलविण्यात आले मात्र तिने ह्या शो ला नाकारले.

हेही वाचा :P Khurana passed away : आयुष्मान खुरानाला पितृशोक, ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर पी खुरानांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details