हैदराबाद :केंद्रीय अर्थसंकल्प 2023 ला प्रतिक्रिया देताना नेटिझन्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांनी आयकर सवलत 7 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर, मध्यमवर्गाच्या भावना व्यक्त करणाऱ्या मीम्सची ट्विटरवर अक्षरशः गर्दी झाली. नेटिझन्सनी रणबीर कपूरचा चित्रपट रॉकस्टार आणि लोकप्रिय टेलिव्हिजन शो तारक मेहता का उल्टा चष्मा मधील क्लिप देखील 2023 च्या बजेटवर मीम्स बनवण्यासाठी वापरल्या. सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प 2023-2024 मध्ये अनेक घोषणा करत असताना, नेटिझन्सनी आधीच सोशल मीडियावर मीम्स पोस्ट करण्यास सुरुवात केली. बाहुबली ते मुघल-ए-आझम आणि मुन्नाभाई एमबीबीएसपर्यंत 2023 च्या अर्थसंकल्पावर वेगवेगळे मीम्स तयार करताना दिसत लोक दिसत आहेत.
हर दिल जो प्यार करेगा : केंद्रीय अर्थसंकल्प 2023 आयकर स्लॅबने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. टॅक्स स्लॅबमधील बदलांवर प्रतिक्रिया देताना, एका नेटिझनने लिहिले, हर दिल जो प्यार करेगा गाण्यातील सलमान खानचा स्क्रीनशॉट शेअर केला.
बाहुबली चित्रपटातील एक कोलाज : दुसर्या एकाने केंद्रीय अर्थसंकल्प 2023 आयकर स्लॅबसाठी करदात्यांच्या अपेक्षेचे चित्रण करण्यासाठी एसएस राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटातील एक कोलाज शेअर केला आहे.
एमएस धोनीमधील एक दृश्य : सुशांत सिंग राजपूत स्टारर एमएस धोनीमधील एक दृश्य शेअर करताना, एका वापरकर्त्याने लिहिले, 'केंद्रीय बजेट 2023 आयकर स्लॅब.'