नवी दिल्ली - बॉलीवूड अभिनेता अजय देवगण त्याचा आगामी चित्रपट 'रनवे 34' च्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान दक्षिणेकडील स्टार किच्चा सुदीप याने हिंदी यापुढे भारताची राष्ट्रभाषा नसल्याबद्दल केलेल्या कॉमेंटनंतर अजय देवगणचे सुदिपसोबत शाब्दिक चकमक उडाली आहे.
सुदीप म्हणाला होता की, पॅन इंडिया चित्रपट कन्नडमध्ये बनत आहेत, मला त्यावर एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. बॉलिवूडमध्ये आज पॅन इंडिया चित्रपट बनत आहेत. ते तेलुगू आणि तमिळ चित्रपटांचे रिमेक बनवत आहे, पण असे असूनही त्यांना संघर्ष करावा लागत आहे. आज आम्ही ते चित्रपट बनवत आहोत जे जगभरात पाहिले जात आहेत, असे विधान त्याने केले होते. यानंतर चांगलाच गदारोळ माजला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका कार्यक्रमादरम्यान सुदीपने सांगितले की, "हिंदी ही आता राष्ट्रभाषा नाही." यानंतर देवगणने त्याच्या ट्विटर हँडलवर सुदीपच्या कॉमेंटवर आपले मत व्यक्त केले.
हिंदीत त्यांनी लिहिले, "किच्चा सुदीप, माझ्या भावा, तुझ्या मते, जर हिंदी आपली राष्ट्रभाषा नसेल तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आमची मातृभाषा व राष्ट्रभाषा होती, आहे आणि कायम राहील. जन गण मन."
अजय देवगणच्या या ट्विटनंतर लगेचच, सुदीपने असे लिहून प्रतिसाद दिला, "हॅलो अजय देवगण सर..मी हे वाक्य बोललो ते पूर्णतः वेगळ्या संदर्भात होते, माझ्या अंदाजानुसार तुमच्यापर्यंत ते पोहोचले आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर हे विधान का केले याबाबत कदाचित सांगेन. हे कुणालाही दुखावण्यासाठी, चिथावणी देण्यासाठी किंवा वादविवाद सुरू करण्यासाठी नव्हते. मी असे का करू सर."
"मला आपल्या देशाच्या प्रत्येक भाषेवर प्रेम आणि आदर आहे सर. मी अगदी वेगळ्या संदर्भात म्हटल्याप्रमाणे, मला हा विषय थांबवायचा आहे, तुम्हाला नेहमीच खूप प्रेम आणि शुभेच्छा. तुम्हाला लवकरच भेटण्याची अपेक्षा आहे," असेही किच्चा सुदिप पुढे म्हणाला.