महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Burak Deniz : तुर्की स्टार बुराक डेनिझ भारताच्या दौऱ्यावर, बॉलिवूड सेलेब्रिटींसह केली मजा मस्ती - Bollywood celebrities on his tour of India

तुर्की स्टार बुराक डेनिझ हा भारतीय संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने गुरुवारी, मुंबईत FICCI फ्रेम्सच्या 23 व्या आवृत्तीत हजेरी लावली असून बॉलिवूडमधील अभिनेते अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांची भेट घेतली.

Turkish star Burak Deniz
तुर्की स्टार बुराक डेनिझ

By

Published : May 5, 2023, 4:27 PM IST

मुंबई:प्रसिद्ध तुर्की स्टार बुराक डेनिझ सध्या हा भारतात आला आहे. बुराक डेनिझ हा भारतात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असून तो भारतीय संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. बुराक हा आपल्या वेळेचा उपयोग हा सर्वोत्तम करून घेत आहे. शिवाय त्याने अनेक बॉलिवूड कलाकारांना भेट दिली आहे. गुरुवारी, बुरक यांनी मुंबईत FICCI फ्रेम्सच्या 23 व्या आवृत्तीत हजेरी लावली, जिथे त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांची भेट घेतली. अनिल कपूरला मिठी मारतानाचा फोटो शेअर करत, बुरकने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, धन्यवाद (स्मायली इमोजी). पोस्ट केले आहे. बुराक याने पांढर्‍या रंगाचा शर्ट पांढऱ्या रंगाचा पॅन्ट आणि ग्रे स्नीकर्स परिधान केला होता. यावेळी बुराक दिसायला देखणा दिसत होता. शिवाय अभिनेता अनिल कपूरने सुद्धा काळ्या रंगाचा टि-शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट आणि काळ्या रंगाचे जोडा घातली होता. आदित्य देखील या कार्यक्रमात काळ्या शूट घातला असून काळ्या रंगाचे जोडा घातला होता.

FICCI फ्रेम्स कार्यक्रम : या कार्यक्रमाला अनेकजणांनी हजेरी लावली होती. त्यानंतर बुराकने त्यांच्या टि्विटर आमिर खान आणि सलमान खानच्या कल्ट फिल्म अंदाज अपना अपना मधील ये रात और ये दूरी हे प्रसिद्ध गाणे ऐकतानाचा एक व्हिडिओ टाकला. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्याने शाहरुख खान स्टारर चैन्नई एक्सप्रेसमधील गाणं शेअर केलं आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर, नेटिझन्सकडून भरपूर लाईक्स आणि टिप्पण्या मिळत असल्याचं दिसत आहे. बुराक देखील बॉलीवूडचा चाहता आहे असे दिसत असून त्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेक वापरकर्त्याने टिप्पणी केली आहे. एका वापरकर्त्याने ने सोशल मीडियावर टिप्पणी केली. 'हाहाहाहा तो खूप मस्त आहे, दुसर्‍याने लिहिले. 'ये रात और ये दूरी गाताना त्याच्या या व्हिडिओने माझा दिवस बनवला,' एका चाहत्याने कमेंट केली.

शाहमारन प्रकल्प: द इग्नोरंट एंजल्स आणि शाहमारन सारख्या प्रकल्पांमध्ये बुराक त्याच्या बहुमुखी कामगिरीसाठी ओळखला जातो. गुरुवारी मुंबईत झालेल्या FICCI फ्रेम्स कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तो भारतात आला होता. तुर्की हार्टथ्रॉब व्यतिरिक्त, आयुष्मान खुराना, मनोज बाजपेयी, अनिल कपूर, भूमी पेडणेकर, आदित्य रॉय कपूर, शोभिता धुलिपाला, जिम सरभ, आणि रकुल प्रीत सिंग, चित्रपट निर्माते विक्रमादित्य मोटवाने, श्रीहन्ताराम, हनताराम, राकुल प्रीत सिंह यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकर उपस्थित होते.

हेही वाचा :'बडे मियाँ छोटे मियाँ' लवकरचं सिनेमागृहात प्रदर्शित होणार

ABOUT THE AUTHOR

...view details