महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीचा व्हिडिओ व्हायरल - तृप्ती डिमरीचा व्हिडिओ

Tripti Dimri video : 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटताना दिसत आहे.

Tripti Dimri video
तृप्ती डिमरी व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 2:38 PM IST

मुंबई - Tripti Dimri video : अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल स्टारर 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटानंतर तृप्तीला खूप प्रसिद्धी मिळाली. आता तिचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट हिट होताच, तृप्तीची लॉटरी लागली आहे, कारण 'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांनी तिला 'आशिकी 3' या चित्रपटासाठी साइन केलं आहे. या चित्रपटामध्ये ती कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर तृप्तीनं एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

तृप्ती डिमरीचा व्हिडिओ व्हायरल :या व्हिडिओमध्ये तृप्ती ती निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तृप्तीने लिहिलं, 'धबधब्याच्या रंगात तुम्ही मोकळा श्वास घ्या.' तृप्तीनं काही वेळापूर्वीच हा व्हिडिओ शेअर केला होता आणि या व्हिडिओवर खूप कमी वेळात 50 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर आता अनेकजण कमेंट करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तृप्तीच्या या व्हिडिओवर काही वेळातच चाहत्यांच्या कमेंट्सचा पूर आला. एका चाहत्यानं या व्हिडिओच्या कमेंट विभागात लिहिलं, ''खूप सुंदर व्हिडिओ आहे.'' त्यानंतर दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''भाभीजी निसर्गप्रेमी आहे. '' आणखी एकानं या व्हिडिओवर लिहिलं, ''मी तुझा खूप मोठा चाहता आहे.'' अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

चाहत्यांची मनं मोठी :व्हिडिओमध्ये, तृप्तीनं निळ्या डेनिमवर काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि त्यावर काळ्या रंगाचा श्रग घातलेला दिसत आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये रुपेरी पडद्यावर रिलीज झाला. या चित्रपटाला चाहत्यांची खूप पसंती मिळाली. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. ओटीटीवर प्रदर्शित झालेले रिअल लाईफ स्टोरीजवर आधारित 2023मधील चित्रपट
  2. सैफ अलीने सांगितला अमृता सिंगसोबत विभक्त होण्याचा प्रसंग, आई शर्मिला टागोर म्हणाल्या 'हे सुसंगत नव्हतं'
  3. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने निर्मित 'पंचक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details