मुंबई 'प्रल्हाद' हा लघुपट award winning short film Pralhad १४ वर्षांच्या मुलाचा प्रेरणादायी प्रवास आहे. ज्याने अवघ्या 10 रुपयांमध्ये व्यवसायात पहिले पाऊल टाकले आणि त्यातुन 10,000 कोटी रुपयांची कंपनी बनवली. आपला दयाळू स्वभाव, उच्च विचार आणि संकल्प सिद्धीतून त्यांने हे साध्य केलेले या चित्रपटात Tribute to Mr P Chhabria दाखविले आहे. PREMIER SHOW PRALHAD
आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये 22 पुरस्कार पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी काही गोष्टी एकदा नाही; तर पुन्हा पुन्हा सांगायला हव्यात. प्रल्हाद ही अशीच एक कथा आहे, जी फिनोलेक्सच्या संस्थापकांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण दाखविते. या कथे मधील मुलगा, जेव्हा तो उच्च आदर्श मूल्यांचे पालन करून, दयाळू स्वभावाने निर्णय घेतो, तेव्हा तो किती प्रभावी असतो, हे यावरून दिसून येते. ही शॉर्ट फिल्म फिनोलेक्सची मुख्य मूल्ये मांडते आणि सुरुवातीच्या टप्प्यात भारतीय उद्योजकांच्या यशावर प्रकाश टाकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या कथेने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये 22 पुरस्कार जिंकले आहेत.
खिशात फक्त 10 रुपये 1945 मध्ये सेट केलेली ही कथा एका 14 वर्षांच्या मुलाची आहे. ज्याने वडिलांच्या मृत्यूनंतर अमृतसरमधील नोकरी सोडली. त्याच्या शर्टच्या खिशात 10 रुपये होते. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय तो घेतो. मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये तो प्रवाशांनी खचाखच भरलेल्या डब्यात बसतो; ज्यामध्ये भारतातील विविधतेचे प्रतिनिधित्व करणारे अनेक लोक असतात. ट्रेन मुंबईच्या दिशेने वेगाने जात असताना, धुराच्या रेषांमधून वाटेत लहान शहरे आणि गावांमध्ये थांबत असते. तरुण प्रल्हाद त्याच्या सहप्रवाशांशी संवाद साधतो. तो त्याच्या हसण्याने आणि सहज बोलण्याने ट्रेनमधील सर्वांना मोहित करतो. सहजतेने त्याने शर्टाचा खिसा तब्बल पंधराव्यांदा तपासला, तेव्हाच लक्षात आले की त्याची १० रुपयांची नोट गायब होती.
10000 कोटींची कंपनी दयाळूपणाने, इतरांबद्दलचा आदर, नैतिकता आणि सहानुभूतीने त्याला दहा रुपयांची नोट कशी परत मिळते? हा कथेचा मुख्य मुद्दा आहे. या सगळ्या गोष्टी, त्याच्या लाडक्या फिनोलेक्स ग्रुपमध्ये अवतरलेल्या, भारतीय उत्पादनात आघाडीवर असलेल्या, या तरुणाच्या उर्वरित प्रवासासाठी एक भक्कम पाया घालतो. चांगल्या दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करणे. शेतकरी, डीलर्स, विक्रेते, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांशी मजबूत आणि चिरस्थायी संबंध निर्माण करण्यासाठी आदर आणि दयाळूपणे व्यवसाय करणे. हे सगळे यामध्ये दाखविले आहे. 10 रुपयांच्या नोटेपासून सुरू झालेला प्रवास श्री. प्रल्हाद पी छाब्रिया यांच्या निधनानंतर 10000 कोटींची कंपनी, एवढ्या मुल्यांचा बनला.
भूतकाळ सुंदरपणे टिपणारा आणि जिवंत करणारा चित्रपट छाब्रिया यांच्या आत्मचरित्रातील सत्य घटनांवर आधारित, 'देअर इज नो सच थिंग अ सेल्फ-मेड मॅन' ची निर्मिती शाबांग मोशन पिक्चर्सने, फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने केली आहे. हा भूतकाळ सुंदरपणे टिपणारा आणि जिवंत करणारा चित्रपट आहे. प्रल्हाद पी. ऋत्विक साहोरे ('लखों में एक' फेम)हा छाब्रियाची भूमिका करत आहे. इतर कलाकारांमध्ये आबिद शमीम, अन्नपूर्णा सोनी आणि चिन्मय दास यांचा समावेश आहे. प्राग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, लंडन फिल्म अँड टेलिव्हिजन फेस्टिव्हल आणि मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधील पुरस्कारांसह 22 जागतिक आणि भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये समीक्षकांची प्रशंसा मिळवल्यानंतर, हा चित्रपट YouTube चॅनेलवर प्रदर्शित झाला.
प्रकाश पी छाब्रिया या चित्रपटावर भाष्य करताना, दिवंगत श्री. प्रल्हाद छाब्रिया यांचे पुत्र, श्री. प्रकाश पी छाब्रिया म्हणाले, 'आम्हाला आशा आहे की, हा लघुपट सर्व नवोदित उद्योजकांना, आज भारतीय उद्योजक ज्या तत्त्वांनुसार जगत आहे. त्या तत्त्वांनी प्रेरित करेल. या चित्रपटात तपशीलवार लोकांची समज आणि सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. आणि आमचे संस्थापक स्वर्गीय श्री प्रल्हाद पी छाब्रिया याचा मोठा पुरावा आहे. ही कथा त्यांच्या मूल्यांचे अतिशय प्रेमाने वर्णन करते.
प्रल्हाद जगासमोर मांडताना आनंदया चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल, चित्रपटाचे निर्माते आणि शाबांगचे संस्थापक हर्षिल कारिया म्हणाले, 'आम्ही सतत सशक्त कथा शोधत असतो. मग आम्ही ज्या ब्रँडसोबत किंवा मानवतेसाठी काम करतो, त्यांच्यासाठी का नाही? काही करायचे असे आमच्या मनात आले.' शाबांग मोशन पिक्चर्स, फिनोलेक्स ग्रुपचे संस्थापक श्री प्रल्हाद पी छाब्रिया यांच्या जीवनातून प्रेरित आहे. त्यांच्या जीवनावर फिचर फिल्म बनवता येईल, याची आम्हाला खात्री असली, तरी हा प्रसंग ‘प्रल्हाद’ या लघुपटाच्या रूपाने जगासमोर मांडताना आम्हाला आनंद होत आहे.
कंपनी भारतीय उद्योजकांसाठी प्रेरणा आणि अभ्यास आहे1981 पासून, फिनोलेक्सने पीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्जमध्ये पूर्णत: एकात्मिक प्रस्तावासह ग्रामीण आणि शहरी ग्राहकांना दर्जेदार उत्पादने प्रदान करून, भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये तसेच प्लंबिंग आणि स्वच्छता क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे. प्रल्हाद पी. छाब्रिया यांचे अभियांत्रिकी उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित करणे आणि संपूर्ण लोकांशी संबंध निर्माण करण्याची त्यांची क्षमता आणि त्यांची मजबूत पकड, यामुळे फिनोलेक्स हे भारतीय उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित नाव बनले आहे. 900 हून अधिक डीलर्स आणि 21,000 रिटेल टच पॉइंट्ससह, दिवंगत संस्थापकांनी फिनोलेक्सच्या उत्पादनांची हमी घेणाऱ्या, ग्राहकांना सेवा देण्यासाठी एक परिवार तयार केला, जो आज चेतनादायी आणि समृद्ध आहे. कंपनीला समृद्ध करण्यासाठी सततची गुंतवणूक, मूल्य शृंखला आणि तांत्रिक सामर्थ्य वाढवणे; कंपनीला भविष्यात वर्चस्व ठेवण्यासाठी तयार ठेवते आणि भारतीय अर्थव्यवस्थेत आपले योगदान चालू ठेवते.
फाउंडेशन आणि संशोधन केंद्राची निर्मिती स्वर्गीय श्री प्रल्हाद छाब्रिया हे त्यांच्या काळातील सर्वात उल्लेखनीय परोपकारी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी मुकुल माधव फाउंडेशनची स्थापना केली. होप फाउंडेशन आणि संशोधन केंद्राची निर्मिती केली. या माध्यमांतून तसेच सामाजिक कल्याणातून, वंचितांसाठी वैद्यकीय सहाय्य, शिक्षण मिळते. त्यांनी रत्नागिरी येथे मुकुल माधव विद्यालय आणि फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, आणि हिंजवडी व पुणे येथे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी संस्था स्थापन केल्या. श्री छाब्रिया नेहमी म्हणत, 'ज्यांना औपचारिक शिक्षणाचा लाभ कधीच मिळाला नाही, तो लाभ आता शेकडो पात्र आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. माझे योगदान या तरुणांसाठी आणि देशासाठी कायमस्वरूपी काहीतरी देईल याचे मला खूप समाधान आहे.' PREMIER SHOW PRALHAD