महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Mourning In The Entire Hindi And Punjabi film Industry: सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमुळे हिंदी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीत शोककळा

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमुळे (Sensation over the murder of Sidhu Musewala) हिंदी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली (Excitement in the entire Hindi and Punjabi film industry) आहे. तसेच, संपूर्ण हिंदी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली (Mourning in Hindi and Punjabi films) आहे. रणवीर सिंगपासून कपिल शर्मापर्यंत सर्वांनी गायकाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अनेक कलाकारांनी ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

Punjabi Singer Sidhu Musewala
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला

By

Published : May 30, 2022, 11:45 AM IST

हैदराबाद : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येवरून संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. या धक्कादायक प्रकरणाची देशाच्या राजकारणातही चर्चा होत आहे. इकडे चित्रपट विश्वातही खळबळ उडाली आहे. वयाच्या २८ व्या वर्षी आपला जीव गमावलेल्या सिद्धू मुसेवाला यांच्या निधनाने पंजाबी चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूड कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला

सिद्धु मुसेवाला यांना येत होत्या धमक्या : सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला यांना अनेक गुन्हेगारांकडून धमक्या येत होत्या. त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूकही लढवली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आम आदमी पक्षाच्या विजय सिंगला यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्याचे खरे नाव शुभदीप सिंग सिद्धू आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला

गॅंगस्टर रॅप गायक म्हणून ओळख : मुसेवाला यांचा जन्म 11 जून 1993 रोजी झाला. तो मानसा जिल्ह्यातील रहिवासी होता. त्यांच्या गावाचे नाव मुसावाला. त्यांची आई गावची सरपंच आहे. त्यांची गायकी थोडी वेगळी होती. लोक त्याला 'गँगस्टर रॅप' सिंगर म्हणायचे. त्याच्या गाण्यात अनेकदा बंदुका दिसत होत्या. ते बंदूक संस्कृतीला चालना देतात, असे लोकांचे म्हणणे आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला

हेही वाचा :सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज; गाड्या पाठलाग करत असल्याचे आले समोर

ABOUT THE AUTHOR

...view details