मुंबई :बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा शेवटची ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या 'वेड' या मराठी चित्रपटात दिसली होती. आता फार दिवसानंतर रूपेरी पडद्यावर ती परत आली आहे. जेनेलिया देशमुख ही ट्रायल पीरियड या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय आता या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या वेब सीरिजमध्ये जेनेलियासोबत मानव कौल देखील असणार आहे. ट्रायल पीरियडचा मजेदार ट्रेलर ७ जुलै रोजी रिलीज झाला आहे. याआधी या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला होता. वेब सीरिजचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण होईल, आता हा नवीन ट्रेंड काय आहे आणि ते होऊ शकते का? हा ट्रेलर फार गोंधळात टाकणारा आहे.
ट्रेलर कसा आहे : ट्रेलरची सुरुवात टीव्हीवर सुरू असलेल्या जाहिरातीने होते. त्यानंतर या वेब सीरिजच्या एका दृश्यात शक्ती कपूर, जेनेलिया आणि वेब सीरिजमध्ये साकारत असलेल्या बालकलाकारासोबत संवाद साधताना दिसत आहे. या दृश्यात तो बालकलाकार ट्रायल पिरियड एका वडिलांची मागणी जेनेलिया करतो. त्यानंतर जेनेलिया ट्रायल पिरियडवर वडील मुलाला भेटू शकेल का या गोष्टीचा शोध घेते. त्यानंतर तिला एक एजन्सी चालवणारा व्यक्ती मिळतो हा व्यक्ती त्यांना एक व्यक्त ट्रायल पीरियडवर देतो त्यानंतर मानव कौल एंन्ट्री होते. जेनेलियाच्या घरात वडील म्हणून ट्रायल पीरियडवर मानव कौल प्रवेश करतो, पण हे मूल त्याला फार त्रास देते. मानव कौल हा चित्रपटात बेरोजगार आहे, म्हणून तो ट्रायल पीरियडवर वडील बनून काही पैसे कमविण्याचा प्रयत्न करतो.