मुंबई- 'शेरदिल: द पिलीभीत सागा' उपाहासात्मक विनोदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सत्य घटनांनी प्रेरित, सृजित मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट शहरीकरण, मनुष्य-प्राणी संघर्ष आणि दारिद्र्य यामुळे जंगलाच्या काठावर राहणाऱ्या एका गावातील विचित्र प्रथेवर आधारित अभ्यासपूर्ण कथा असलेला चित्रपट आहे.
ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी याने साकारलेल्या गंगारामची कथा पाहायला मिळते. जो गावातील एक कुप्रसिद्ध प्रथा स्वीकारतो आणि आपला जीव देण्यास तयार होतो जेणेकरून वाघाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबाला सरकारने दिलेल्या पैशाचा फायदा त्याच्या गावाला मिळेल. एके दिवशी गंगाराम जंगलात शिरतो आणि त्याच्यावर वाघाने हल्ला करण्याची प्रतीक्षा करतो. तिथो तो जिम या शिकारी व्यक्तीला भेटतो. त्यानंतर एक मनोरंजक घटनांची मालिका पाहायला मिळते.