मुंबई - आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाचा ट्रेलर आयपीएल 2022 च्या अंतिम फेरीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे
चित्रपट समीक्षक आणि चित्रपट व्यापार विश्लेषक, तरण आदर्श यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, "आमिर खान: 'लाल सिंह चढ्ढा' ट्रेलर आयपीएल फायनल दरम्यान... आमिर खान 'लाल सिंह चढ्ढा'चा ट्रेलर लॉन्च करणार आहे. सामना रविवार, 29 मे 2022 आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रिलीज होणार आहे."
'लाल सिंग चड्ढा' हा आमिर खानचा कॉमेडी-ड्रामा चित्रपट या वर्षातील सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे आणि चाहते टीझरची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, 'लाल सिंग चढ्ढा'च्या निर्मात्यांनी अलीकडेच चित्रपटातील 'कहानी' आणि 'मैं की करां' ही दोन गाणी रिलीज केली आहेत. या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. या चित्रपटात करीना कपूर खान, नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. हा चित्रपट 1994 मध्ये अमेरिकेत प्रदर्शित झालेल्या 'फॉरेस्ट गंप' या अमेरिकन चित्रपटावर आधारित आहे. 'लाल सिंग चढ्ढा' 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -Cannes 2022 : कान्समध्ये अदिती हैदरीने सब्यसाची साडीत दाखवला जलवा