मुंबई : टीव्ही अभिनेत्री मोनिका भदौरियाने अलीकडेच तारक मेहता का उल्टा चष्माच्या निर्मात्यांवर आरोप केले आहेत. शोमध्ये काम करताना इतका छळ झाला की आत्महत्या करावीशी वाटू लागल्याचे असे तिने सांगितले. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत मोनिकाने सांगितले की, मी अनेक कौटुंबिक दुःखातून जात आहे. मी माझी आई गमावली, मी माझी आजी गमावली आणि हे सर्व खूप कमी कालावधीत घडले. दोघेही माझ्या आयुष्याचे आधारस्तंभ होते, त्यांनी मला खूप चांगले वाढवले. त्यांच्या मृत्यूचे दु:ख मला सहन होत नव्हते कारण त्या दोघांच्या मी खूप जवळचे होते. मी त्यांच्या समस्यांना तोंड देऊ शकले नाही. म्हणूनच मला वाटले की माझे आयुष्य संपले आहे. यादरम्यान मी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'साठी काम करत होतो, तोही खूप त्रासदायक होता. पुढे तिने सांगितले की, निर्मात्यांनी तिचे तीन महिन्यांची थकबाकी दिली नाही, जे सुमारे 4-5 लाख रुपये होते.
मोनिका भदौरियाने केला खुलासा : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये मोनिका भदोरिया बागाच्या गर्लफ्रेंड बावरीची भूमिका साकारताना दिसत आहे. मोनिकाने दुसऱ्या एका मुलाखतीत, शोबद्दल खुलासा करताना सांगितले, की प्रत्येक दिवस तिचा 'नरक'मध्ये जात आहे असे तिला वाटाचे. तिने दावा केला की जेव्हा तिची आई कॅन्सरवर उपचार घेत होती तेव्हा शोच्या निर्मात्यांनी तिला साथ दिली नाही. मोनिकाने सांगितले की, 'मी रात्रभर हॉस्पिटलमध्ये राहायचे आणि ते मला शूटसाठी पहाटे फोन करायचे. मी त्यांना मानसिक आरोग्याबद्दल सांगितले मात्र त्यांनी मला कामावर येण्यासाठी भाग पाडले. इतकंच नाही तर शूटवर आल्यानंतरही मला थांबायला लावायचे. मला काही करायचे नव्हते.