महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Tiger Shroff visited Siddhivinayak : 'गणपथ' चित्रपट रिलीजनंतर टायगर श्रॉफ सिद्धीविनायकाच्या चरणी लीन - Tiger Shroff visited the Siddhivinayak temple

Tiger Shroff visited Siddhivinayak : टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनची भूमिका असलेला 'गणपथ' चित्रपट २० ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतंच, टायगरनं मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराला भेट दिली आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतला.

Tiger Shroff visited Siddhivinayak
टायगर श्रॉफ सिद्धीविनायकाच्या चरणी लीन

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 5:42 PM IST

Updated : Oct 20, 2023, 6:20 PM IST

मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनची भूमिका असलेला बहुप्रतीक्षित 'गणपथ' चित्रपट आज देशभर रिलीज झाला. सोशल मीडियावर चित्रपट पाहिलेल्या चाहत्यांना भरभरुन प्रतिसाद देत चित्रपट आवडल्याचा संदेश टायगरपर्यंत पोहोचवला आहे. दरम्यान, गणेश भक्त असलेल्या टायगरनं 'गणपथ'च्या रिलीजनंतर मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराला भेट देऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला आहे.

टायगर श्रॉफ सिद्धीविनायकाच्या चरणी लीन

मंदिरात बाप्पासमोर टायगर श्रॉफ नतमस्तक झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. अनेक भाविकांसह त्यानं दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी मंदिराच्या पुजाऱ्यानं त्याला बाप्पाचा आशीर्वाद म्हणून बाप्पाच्या गळ्यातील भगवं वस्त्र टायगरला दिलं आणि प्रसादही दिला. मंदिरात उपस्थित अनेकांनी टायगरला आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात शूट केलं.

शुक्रवारी 'गणपथ' चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सचा खूपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. टायगरच्या भूमिकेचं, यातील ॲक्शन सीन्सचं चाहते भरभरुन कौतुक करताहेत. क्रिती सेनॉनसोबत टायगरच्या ऑन स्क्रिन केमेस्ट्रीवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. त्याच्या चित्रपटाला फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी आशीर्वाद दिलेत. यामध्ये दिग्गज सुपरस्टार रजनीकांतचाही समावेश आहे. आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून रजनीकांतने टायगर श्रॉफला गणपथच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर लगेचच टायगरनं त्यांचं आभार मानलं. आपल्या मुलाचं कौतुक करण्यासाठी रजनीकांतनं शुभेच्छा पाठवल्याचं ध्यानात आल्यानंतर जॅकी श्रॉफनंही थलैयवाचं आभार मानलंय. रजनीकांत आणि जॅकी श्रॉफ यांच्यात मैत्रीचं चांगलं नातं तयार झालंय. अलिकडेच रजनीच्या 'जेलर' चित्रपटात जॅकी श्रॉफनं भूमिका साकारली होती.

दरम्यान, टायगर श्रॉफ आगामी काळात अनेक चित्रपटातून झळकणार आहे. त्याच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामध्ये तो अक्षय कुमार सोबत झळकेल. हा चित्रपट पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे. या व्यतिरिक्त, रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि करीना कपूर खान यांच्यासमवेत दिसणार आहे. यामध्ये तो एसीपी सत्याची भूमिका साकारत आहे.

Last Updated : Oct 20, 2023, 6:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details