मुंबई Tiger shroff and janhvi kapoor : टायगर श्रॉफला बॉलिवूड इंडस्ट्रीत अॅक्शन किंग म्हणून ओळखलं जातं. टायगर अनेक चित्रपटांमध्ये अॅक्शन मोडमध्ये दिसला आहे. टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. 'पठाण' चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या अॅक्शन चित्रपट 'रेम्बो'मध्ये टायगर दिसणार असल्याचं समजत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर देखील असणार आहे. 'वॉर'च्या यशानंतर सिद्धार्थ आनंद टायगर श्रॉफसोबत ब्लॉकबस्टर अॅक्शन फिल्म बनवण्याचा विचार करत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.
हॉलिवूड चित्रपट 'रॅम्बो'चा हिंदी रिमेक : हा अॅक्शन चित्रपट हॉलिवूड सुपरस्टार सिल्वेस्टर स्टॅलोनच्या प्रसिद्ध फ्रेंचाइजी 'रॅम्बो'चा हिंदी रिमेक असणार आहेत. सिद्धार्थ आणि त्याची टीम दिग्दर्शक रोहित धवनसोबत या चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. 'रेम्बो'चं शूटिंग पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सुरू केलं जाऊ शकतं. टायगर हा पहिल्यांदा जान्हवीसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग ही युरोपमध्ये होणार आहे. टायगर या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत असून त्याच्या फिटनेसकडे तो जास्त लक्ष देत आहे. 'रेम्बो' चित्रपटामध्ये टायगर हा धोकादायक अॅक्शन आणि स्टंट करताना दिसणार आहे.