महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Tiger 3 box office: सलमान आणि कतरिनाच्या 'टायगर 3' ची तिसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिवाळी - टायगर 3 चित्रपट यंदाच्या दिवळीतलं मोठं आकर्षण

Tiger 3 box office: सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या भूमिका असलेल्या टायगर फ्रँचायझीचा तिसरा भाग दिवाळी निमित्त रिलीज झाला. जबरदस्त ओपनिंग मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शंभर कोटींचा क्लब गाठला. आता तिसऱ्या दिशीच्या कमाईनंही निर्मात्याची दिवाळी आनंदी केली आहे.

Tiger 3 box office
सलमान आणि कतरिनाच्या टायगर 3 ची दिवाळी

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 12:43 PM IST

मुंबई -Tiger 3 box office: सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट यंदाच्या दिवाळीतलं मोठं आकर्षण ठरला. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अभूतपूर्व ओपनिंग मिळालं. दुसऱ्याच दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमा झाला. तिसऱ्या दिवशी 'टायगर 3' ची कमाई 42.50 कोटी इतकी झालीय.

'टायगर 3' च्या तिसर्‍या दिवशी अंदाजे 42.50 कोटींचे कलेक्शन झाले. ही कमाई पहिल्या आणि दिवसाच्या आकडेवारीच्या तुलनेत कमी आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी (रविवार) 44.5 कोटी आणि दुसऱ्या दिवशी (सोमवार) 58 कोटीची कमाई करीत मोठी वाढ झालेली दिसली. परिणामी केवळ दोन दिवसांत एकूण 103.50 कोटीचे कलेक्शन झाले. तिसर्‍या दिवसाच्या एकूण कलेक्शनसह बॉक्स ऑफिसवरील भारतातील कमाई आता 146 कोटी झाली आहे.

जागतिक स्तरावर 'टायगर 3' ने 220 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'एक था टायगर' या चित्रपटाचं एकूण ग्लोबल कलेक्शन 330 कोटींचं झालं होतं. एका दशकापूर्वी केलेल्या या कमाईच्या दिशेनं 'टायगर 3' नं एक पाऊस पुढे टाकलं आहे. त्या तुलनेत २०१७ मध्ये रिलीज झालेल्या 'टायगर जिंदा है'ने 565 कोटी रुपयांची कमाई केली होती. हेरगिरीवर आधारित 'टायगर जिंदा है' हा 'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

यशराज फिल्म्सच्या गुप्तहेर विश्वाचा 'टायगर 3' हा एक भाग आहे. सलमान खानसह कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या स्पाय थ्रिलर चित्रपटामध्ये हृतिक रोशनने 'वॉर' चित्रपटामध्ये साकारलेला कबीर आणि पठाणमधील शाहरुख खानने साकारलेला पठाण यांच्या कॅमिओ भूमिकांचाही समावेश आहे.

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सला 2023 हे वर्ष फलदायी ठरलंय. यंदा जानेवारीत शाहरुख खानच्या 'पठाण'ला घवघवीत यश मिळालं. त्यानंतर 'टायगर 3' च्या यशानं या वर्षाची सांगता होणार आहे. पुढच्या वर्षी 'वॉर' चित्रपटाचा सीक्वेल मोठं आकर्षण ठरेल. यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन यांचा अ‍ॅक्शन पॅक्ड ड्रामा पाहायला मिळणार आहे. याशिवाय महिला गुप्तहेरांचं नवं विश्वही यशराज निर्माण करणार आहे.

हेही वाचा -

1. Ram Charan Diwali Bash : राम चरणच्या दिवाळी पार्टीत राजा कुमारीसोबत थिरकला सुपरस्टार चिरंजीवी

2.Bigg Boss 17 Day 31 Highlights: बिग बॉसमध्ये अंकिता लोखंडे विक्की जैनपासून विभक्त, अनुराग ढोबळला शो सोडण्याची इच्छा

3.Aquaman 2 Vs Dunky : शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाच्या एक दिवस आधीच रिलीज होणार 'अ‍ॅक्वामन 2'

ABOUT THE AUTHOR

...view details