महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बॉक्स ऑफिसवर 'टायगर 3'च्या कमाईत झाली घसरण ; पाहा किती गल्ला जमवला - बॉक्स ऑफिस कलेक्शन

Tiger 3 Collection Day 10: 'टायगर 3'च्या कमाईत आता बॉक्स ऑफिसवर घसरण पाहायला मिळत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या 10 व्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Tiger 3 Collection Day 10
टायगर 3 कलेक्शन दिवस 10

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 4:10 PM IST

Updated : Nov 22, 2023, 5:16 PM IST

मुंबई -Tiger 3 Collection Day 10:सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 44 कोटींहून अधिक कलेक्शनसह बंपर ओपनिंग केली. रिलीजच्या एका आठवड्यात 'टायगर 3' नं 200 कोटींचा आकडा पार केला. मात्र, आता चित्रपटाच्या कमाईचा आलेखही घसरत जात आहे. रिलीजच्या नवव्या दिवसापासून चित्रपटाची कमाई दुहेरी अंकांवरून सिंगल डिजिटवर घसरली आहे. 'टायगर 3' नं रिलीजच्या दहाव्या दिवशी किती कलेक्शन केले, हे जाणून घेऊ या.

'टायगर 3' ची 10व्या दिवशीची कमाई :'टायगर 3' चित्रपटानं दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केल्यापासून चित्रपटगृहांमध्ये गर्दी कमी झाल्याचं दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कामगिरी दिवसेंदिवस निराशाजनक होत आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी 44.5 कोटींची चांगली सुरुवात करणारा हा चित्रपट आता 10 कोटींचा आकडा गाठण्यासाठी रुपेरी पडद्यावर धडपड करत आहे. या चित्रपटाचं पहिल्या आठवड्यात कलेक्शन 187.65 कोटी रुपये होते.

'टायगर 3'च्या कमाईत झाली घसरण : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'टायगर 3'च्या दुसऱ्या आठवड्यातील कमाईबद्दल बोलायचं झालं, तर या चित्रपटानं शुक्रवारी 13.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. शनिवारी सलमान खानच्या चित्रपटाची कमाई 18.5 कोटी रुपये होती. यानंतर 'टायगर 3' नं दुसऱ्या रविवारी म्हणजेच आठव्या दिवशी 10.5 कोटी रुपये कमावले आणि नवव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या सोमवारी या चित्रपटाचे कलेक्शन फक्त 7.35 कोटी रुपये झाले होते. आता रिलीजच्या 10व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी 'टायगर 3'च्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. 'टायगर 3' नं रिलीजच्या 10व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी फक्त 6.7 कोटी रुपये कमावले आहेत. यासह या चित्रपटाची एकूण कमाई आता 243.95 कोटींवर पोहोचली आहे.

300 कोटी रुपये कमाई करणं कठीण : 'टायगर 3' सिंगल डिजिटमध्ये कलेक्शन करत आहे, त्यामुळं हा चित्रपट फार काळ रुपेरी पडद्यावर टीकणार नाही. 'टायगर 3'च्या कमाईचा वेग पाहता देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा पार करणं खूप कठीण वाटतंय. मात्र, वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ शक्यता वर्तवली जात आहे. हा चित्रपट चांगले कलेक्शन करेल अशी आशा निर्मात्यांची आहे.

सर्वाधिक कमाई करणारे दिवाळीमधील चित्रपट

1 ) टायगर 3 (2023) 400 कोटींहून अधिक जगभरात कमाई

Last Updated : Nov 22, 2023, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details