मुंबई - Ranveers same tale of first meeting : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोच्या आठव्या सीझनमधील पहिल्याच भागात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या प्रेमकथेबद्दलचा खुलासा केला. त्यांची पहिली भेट संजय लीला भन्साळी यांच्या घरी झाली होती. दीपिकानं दार उघडल्यानंतर ती त्याला देवदुता प्रमाणे भासली होती. यापूर्वी त्याची आणि अनुष्का शर्माची यशराज फिल्म्सच्या स्टुडिओत झालेल्या भेटीचेही सुंदर वर्णन रणवीरनं केलं होतं.
'कॉफी विथ करण 8' च्या प्रीमियरमधील दीपिका आणि रणवीरच्या कर्टन रेझर एपिसोडनं इंडरनेटवर खळबळ उडवून दिली. यापूर्वी याच शोमध्ये त्यानं अनुष्का शर्माची पहिली भेट कशी झाली होती याचं वर्णन केलं होतं. रणवीरनं दीपिकाच्या पहिल्या भेटीचं केलेलं वर्णन अनुष्काच्या भेटीशी मिळतं जुळतं आहे. रणवीरनं स्क्रिप्टमध्ये थोडा तरी बदल करायला हवा होता असं अनेक नेटिझन्सनी म्हटलंय.
रणवीरच्या बोलण्यावर ताशेरे ओढत एकानं लिहिलं, 'रणवीर भाई थोडी तो स्क्रिप्ट बदल कर लेता.' आणखी एकानं अशाच प्रकारची प्रतिक्रिया देताना लिहिलं, 'चेकी ये कौनसा स्क्रिप्ट है जो हर जगा समान है.'
12 वर्षापूर्वी रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा डेटिंग करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 'कॉफी विथ करण'च्या तिसऱ्या सिझनमध्ये ते दोघं एकत्र दिसले होते. त्यांनी 'बँड बाजा बारात', 'लेडीज वर्सेस रिकी बहल' आणि 'दिल धडकने दो' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. पण त्यांच्यात हे प्रेम प्रकरण आकाराला आले नाही. दरम्यान अनुष्का आणि विराट कोहलीच्या डेटिंगच्या बातम्या मथळे बनवत होत्या. अखेर 20217 मध्ये अनुष्कानं इटलीमध्ये विराटसोबत लग्नगाठ बांधली. अनुष्कानंतर रणवीरनं दीपिकाला डेट करायला सुरुवात केली आणि 'गोलियों की रासलीला राम-लीला'च्या निर्मितीदरम्यान त्यांचं नातं फुललं. अखेर या जोडप्याने 2018 मध्ये लग्न केलं.