मुंबई: माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ अभिनेते उप्पलापती कृष्णम राजू ( Veteran actor Uppalapathy Krishnam Raju ) यांचे रविवारी पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन ( Uppalapati Krishnam Raju passed away on Sunday ) झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. राजू हे 'बाहुबली' स्टार प्रभासचे काका होते, ज्यांच्याशी त्याचे खूप जवळचे नाते होते. कृष्णम राजू नेहमी आपल्या पुतण्याबद्दल खूप बोलत. प्रभासला त्याच्या काकांबद्दल प्रचंड आदर होता, हे त्याच्या मुलाखतींवरून स्पष्ट होते. मात्र, कृष्णम राजूची शेवटची इच्छा प्रभास पूर्ण करू शकला नाही.
प्रभासच्या वाढदिवसाच्या पोस्टमध्ये त्याच्या काकांनी लिहिले होते की, पुतण्याचे यश पाहून त्यांना खूप आनंद होतो. यापेक्षा जास्त आनंद त्यांना कशाचा होत नाही. अभिमानी वडिलांप्रमाणे कृष्णम राजू अनेक वर्षांपासून प्रभासच्या लग्नाची वाट पाहत होते ( waiting for Prabhas marriage ). पण, अभिनेता त्याच्या काकांची इच्छा पूर्ण करू शकला नाही. या वर्षाच्या सुरुवातीला कृष्णम राजूने एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रभासने लग्न करून सेटल व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.