मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी गेल्या महिन्यात लग्नबंधनात अडकले होते. एका पुरस्कार सोहळ्यातील मिशन मजनू स्टार सिद्धार्थचा व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, सिद्धार्थ फेब्रुवारीमध्ये कियारासोबत लग्न केल्यानंतरचा दुसरा पुरस्कार जिंकल्यानंतर भाषण करताना दिसत आहे. हा पुरस्कार त्याने आपली पत्नी कियाराला समर्पित करुन तिच्यावरील आपले प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केल्याने कियाराला भुरळ पडली आहे.
शुक्रवारी रात्री सिद्धार्थला त्याच्या स्टाईल गेमसाठी पुरस्कार मिळाला. अभिनेता सिद्धार्थ सध्या इंटरनेटवर यामुळे खूप चर्चेतआहे. त्याचा रेड कार्पेट लूकच्या व्यतिरिक्त त्याने कियारावरील प्रेम अनोख्या पद्धतीने दाखवल्याने या जोडप्याच्या चाहत्यांना आनंदाच्या उकळ्या फुट आहेत.
शनिवारी, कियाराने इंस्टाग्राम स्टोरीजवर सिद्धार्थचा व्हायरल व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो आपल्या पत्नीबद्दल गप्पा मारताना दिसत आहे. आपल्या नावाने पुरस्कार समर्पित केल्यानंतर भारावलेल्या कियाराने इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, 'या माणसाकडे माझे संपूर्ण हृदय आहे,' असे तिने लाल हृदय इमोजीसह लिहिले आहे.